भारतीय संघाचा निष्णात फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वांत खतरनाक फलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा सूर्यकुमार मैदानात फलंदाजी करत असतो तेव्हा त्याला रोखणे कठीण असते. तो मैदानातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये फटके मारू शकतो आणि म्हणूनच त्याला भारताचा ‘मिस्टर 360’ म्हटले जाते. मात्र, सूर्यकुमारच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत आणि समर्पण आहे. तसेच, त्याच्या यशामध्ये त्याच्या आहाराचाही मोठा वाटा आहे. तो आपल्या आहाराची नेहमीच विशेष काळजी घेतो.

यंदाच्या टी२० विश्वचषकाच्या पाच सामन्यांमध्ये एकूण २२५ धावा करून, सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सूर्यकुमार पहिल्या तीन फलंदाजांमध्ये आहे. या यादीत विराट कोहली प्रथम स्थानावर आहे. फिटनेस राखण्यासाठी भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार ‘चीट मील’ पासून दूर राहतो. तसेच तो कार्बोहायड्रेट्सही कमी घेतो.

सूर्याच्या आहाराची काळजी घेणारी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट श्वेता भाटिया यांनी सूर्यकुमार इतका फिट असण्याचे रहस्य सांगितले आहे. त्याचबरोबर हा फलंदाज कोणता आहार चार्ट फॉलो करतो आणि त्याने त्याच्या शरीरावर आणि फिटनेसवर कसे काम केले आहे, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. श्वेता म्हणाल्या की त्या सूर्यकुमारबरोबर गेले वर्षभर काम करत आहेत. त्याला त्याचा एकूण फिटनेस सुधारायचा होता. त्यामुळे श्वेता यांनी त्याची क्रीडा पोषणाची समझ सुधारण्यास मदत केली.

महागड्या औषधांशिवायच कमी करता येईल उच्च रक्तदाबाची समस्या; जाणून घ्या, कसं

५ बिंदूंवर आधारित आहे सूर्यकुमारचा डाएट

श्वेता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमारचा आहार पाच बिंदूंवर आधारित आहे.

  • पहिला – ट्रेनिंग आणि सामन्यादरम्यान प्रदर्शनात सुधार
  • दुसरा आणि सर्वांत महत्त्वपूर्ण – खेळाडूंनुसार शरीरातील चरबीची पातळी राखणे (१२ ते १५ टक्के)
  • तिसरा – आहाराच्या माध्यमातून उत्साही राहणे
  • चौथा – जास्त खाण्याची इच्छा कमी करणे
  • पाचवा आणि सर्व खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण – बरे होण्यास मदत करणे

श्वेता यांनी सूर्यकुमारच्या शरीरातील लवचिकता वाढवण्यासाठी आणि सर्वोच्च परिणाम मिळवण्यासाठी त्याची कार्बोहायड्रेटचे सेवन करण्याची पातळी अतिशय कमी केली आहे.

लघवीमधील ‘हे’ बदल आहेत किडनीच्या आजाराची गंभीर लक्षणे; वेळीच लक्ष दिले नाहीत तर होईल मोठे नुकसान

श्वेता म्हणतात, “नवीनतम संशोधनातून असे समोर आले आहे की कमी कर्बोदकांचे सेवन केल्याने खेळाडू आपले खेळातील सातत्य राखू शकतो. तसेच तो आपल्या प्रदर्शनामध्ये वाढही करू शकतो. आम्ही सूर्यकुमारच्या आहारातून बहुतेक कार्बोहायड्रेट्स काढून टाकले आणि त्यामध्ये बदाम आणि ओमेगा ३ सारख्या निरोगी फॅट्सचा समावेश केला. तो अंडी, मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्यांमधून चांगल्या प्रमाणात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मिळवतो.”

आहारतज्ज्ञ श्वेता यांना गर्व आहे की सूर्यकुमार आपल्या फिटनेसकडे खूपच लक्ष देतो. तसेच त्याच्या आहारामध्ये आइस्क्रिम, मटण बिर्याणी किंवा पिझ्झा यासारख्या ‘चीट मील’चा क्वचितच समावेश केलेला पाहायला मिळतो. श्वेता आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणतात, “सूर्याकुमारची मानसिकता एका उच्चभ्रू खेळाडूची आहे आणि तो इतर सर्व गोष्टींपेक्षा त्याच्या खेळाला प्राधान्य देतो. त्यामुळे त्याच्या आहारात चीट मील ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्याने आहाराचे पालन करण्यास सुरुवात केल्यापासून त्याला जंक फूडची लालसा वाटत नाही.”