Know About Masterdating or Solo Dating : प्रत्येक जण जोडीदारासोबत डेटवर जातो; पण कोणी कधी एकटा डेटवर जातो का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. एकट्याने डेटवर जाण्याला मास्टरडेटिंग म्हणतात; जे आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेंड करीत आहे. सोलो डेटिंग फॉलो करणारे बरेच लोक याचा आनंद घेत आहेत. तसेच ते त्यांचे अनुभव एकमेकांशी शेअर करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर मास्टरडेटिंगचे फोटो शेअर करीत लोक एकमेकांना सांगतात, ”ते सोलो डेटिंगचा आनंद कसा घेत आहेत.” तुम्हालाही मास्टरडेटिंग किंवा सोलो डेटिंगबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.
मास्टरडेटिंग म्हणजे काय?
स्वत:सोबत एकटा वेळ घालवताना स्वत:ला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणे याला मास्टरडेटिंग म्हणतात. या सोलो डेटदरम्यान, लोक एकटे फिरायला जातात, स्वतःला भेटवस्तू देतात. स्वत:मध्ये दडलेल्या गुणांबाबत विचार करतात. ब्रिटन व अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये मास्टरडेटिंगचा हा ट्रेंड वाढत आहे.
हेही वाचा – पालकांनो, तुमच्या ‘या’ चुकांमुळे मुलं होत नाही स्वावलंबी, आजपासूनच स्वतःमध्ये बदल घडवून आणा
Me-Time चा आनंद लुटण्याचा हा एक मार्ग आहे
डेटिंग तज्ज्ञ मेलिसा स्टोन, ज्या ट्रेंडिंग संकल्पनेचे समर्थन करतात, त्यांनी ‘ग्लॅमर यूके’ला सांगितले की, ”मास्टरडेटिंगचा सराव Me-Time म्हणजेच स्वत:साठी वेळ घालवण्यास आणि स्वतःच्या आवडी शोधण्यासाठी संधी देते; ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडी शोधता येतात आणि त्यांना स्वतःला प्रोत्साहन देता येते.” त्यांनी लोकांना डेटवर जाण्यासाठी आणि त्यांना आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या मते, ”मास्टरडेटिंग ही अशी गोष्ट आहे की, जी एकट्याने गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
हेही वाचा – तुमचे मुलं इंट्रोवर्ट आहे की लाजाळू? त्यांच्यात आत्मविश्वास कमी आहे का? अशी ओळखा लक्षणे
काहीही विचार न करता मास्टरडेटिंगचा आनंद घ्या
प्रसिद्ध डेटिंग प्रशिक्षक एमी नोबिल यांनी ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितले, ”मास्टरडेटिंग म्हणजे तुमच्या इच्छा, गरजा व तुम्हाला आनंद देणार्या गोष्टींचा विचार करणे आणि समजून घेणे. ही बाब कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या आत दडलेली तुमची स्वतःची आवड शोधण्यास मदत करते.” एमी नोबिल लोकांना सल्ला देते, ”मास्टरडेटिंग ट्रेंड फॉलो करताना जास्त विचार करण्याची, काळजी करण्याची किंवा सतर्क राहण्याची गरज नाही. काहीही विचार न करता फक्त सोलो डेटिंगचा आनंद घ्यायचा आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले, तरच ते इतरांना तुमच्यावर प्रेम करण्यास आकर्षित करील.”
#MasterDating हा TikTok वर जगातील अनेक देशांमध्ये मोठा ट्रेंड बनला आहे आणि लोकांनी सोलो डेटिंगवर त्यांचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.