पिझ्झा खायला सर्वांना आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पिझ्झा खाण्याचे शौकीन असतात. मग तो होममेड असो किंवा हॉटेल मधला. जर तुम्ही देखील घरी पिझ्झा बनवत असाल, तर नेहमीच्या पिझ्झाऐवजी, तुम्ही थोड्या वेगळ्या स्टाईलमध्ये बनवलेला पिझ्झा खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला वुड फायर पिझ्झा बद्दल सांगत आहोत, हा पिझ्झा खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की हा वुड फायर पिझ्झा तुमच्या नेहमीच्या पिझ्झा पेक्षा कसा वेगळा आहे. पातळ-क्रस्ट पिझ्झा असो किंवा शिकागो पिझ्झा असो, या इटालियन डिशमध्ये १०९ पेक्षा जास्त प्रकार आणि पाककृती आहेत. वुड फायर पिझ्झा ही अशीच एक विविधता आहे जी आजकाल ट्रेंडमध्ये आहे. वुड फायर पिझ्झा हा पिझ्झाचा सर्वात जुना प्रकार आहे. भारतात, या स्वयंपाक पद्धतीचा वापर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चला, जाणून घेऊया वुड फायर पिझ्झाविषयी खास गोष्टी.
वुड फायर पिझ्झा काय आहे ?
वुड फायर पिझ्झा विटांच्या ओव्हनमध्ये शिजवला जातो, जो थेट लाकडाची आग वापरून गरम केला जातो. नेपल्सपासून हा पिझ्झा जगभर प्रसिद्ध झाला आहे. वुड फायर पिझ्झासाठी पारंपारिक स्वयंपाक तंत्रासारखे वातावरण आवश्यक आहे. वीज आणि गॅस वापरण्याऐवजी, लाकूड-फायर पिझ्झा लाकूड जाळून शिजवला जातो, ज्यामुळे त्याला धुराची चव येते.
( हे ही वाचा: Garlic Soup Recipe: रेस्टॉरंट स्टाईलमध्ये लसूण सूप बनवा घरच्या घरी; जाणून घ्या रेसिपी)
वुड फायर पिझ्झा कसा तयार होतो?
हा पिझ्झा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हनमध्ये इंधन म्हणून लाकूड वापरलं जातं. या विशिष्ट प्रकारच्या ओव्हनद्वारे निर्माण होणाऱ्या उष्णतेने हा पिझ्झा शिजतो. या पिझ्झाचं वगेळेपणा म्हणजे तो थेट आगीच्या उष्णतेने शिजवला जात नाही. त्याऐवजी हा पिझ्झा ओव्हनच्या विटा आणि भिंतीमधील उष्णतेच्या सहाय्याने शिजवला जातो. आता ही पद्धत वेळखाऊ वाटत असली तरी पिझ्झा काही मिनिटांत तयार होण्यासाठी या ओव्हन चेंबरला जास्तवेळ उष्णता दिली पाहिजे. लाकडं पेटवल्यानंतर आगीच्या उष्णतेमुळे ओव्हन हळूहळू गरम होऊ लागतो. विटा आणि टाइल्स किंवा भिंती पूर्णपणे गरम झाल्यानंतर कोळसा काढून टाकला तरी चालतं.