Morning Habits: असं म्हणतात, सकाळची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळची वेळ संपूर्ण दिवसाची स्थिती आणि दिशा ठरवते. परंतु, बरेच लोक सकाळी अशा गोष्टी करायला सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांना दिवसभर त्रास होत राहतो. त्यामुळेच पूर्वीचे लोक सकाळी त्यांची दैनंदिन दिनचर्या चांगली ठेवतायचे, ज्यामुळे त्यांचे मनदेखील खूप प्रसन्न राहायचे.

मात्र, आजकाल सकाळी उठल्यानंतर केल्या जाणाऱ्या चांगल्या गोष्टी फार कमी लोक करताना दिसतात. खरं तर, सकाळच्या काही वाईट सवयी मेंदूला मंद आणि कमकुवत बनवतात.

सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी करू नये

सकाळी उठल्याबरोबर फोनमध्ये पाहणे

बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर त्यांचे फोन तपासायला सुरुवात करतात. सकाळी झोपेतून उठताच फोनकडे पाहिल्याने मेंदूवरचा भार वाढतो, ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि सर्जनशील होऊ शकत नाही.

नाश्ता न करणे

असे बरेच लोक सकाळी नाश्ता वगळतात आणि उपाशी राहतात. खरं तर सकाळी नाश्ता न केल्याने मेंदूला ऊर्जा मिळत नाही. जास्त वेळ उपाशी राहिल्याने एकाग्रता आणि मनःस्थिती दोन्हीवर परिणाम होतो.

पाणी न पिणे

सकाळी उठल्यानंतर शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी पाणी प्यायल्याने मेंदूच्या पेशी खूप सक्रिय होतात. जर तुम्ही सकाळी पाणी प्यायलात नाही, तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

उशिरापर्यंत अंथरुणावर पडून राहणे

अनेक सकाळी उशिरा उठतात, ही सवय आरोग्यासह मेंदूसाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

सकाळी उठल्याबरोबर काय करायला हवे?

आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर लगेच एक ते दोन ग्लास पाणी प्या. त्यानंतर ५-१० मिनिटे ध्यान करा आणि दीर्घ श्वास घ्या. मग हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करून, पौष्टिक नाश्ता करा. पौष्टिक नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.