High Cholestrol: शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल हा एक वाईट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्याची पातळी सतत वाढत राहिल्यास हृदयविकार, मज्जातंतू संबंधित रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. सर्वप्रथम जाणून घ्या कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा आरोग्याच्या समस्या सुरू होतात. यकृत देखील शरीरात नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल बनवते आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आहार. तसंच, आपण कोणतीही शारीरिक क्रिया न केल्यास, उच्च कोलेस्टेरॉल आणखी वाढू शकते.

( हे ही वाचा: शाकाहारी लोकांसाठी ‘हे’ पदार्थ करतील प्रोटीनची कमतरता पूर्ण ; येथे पाहा यादी)

कोलेस्टेरॉलची लक्षणे कोणती?

महत्वाचं म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉलची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे आणखी किती कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे लगेच ओळखता येत नाही. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो. याशिवाय, अशी काही चिन्हे देखील आहेत जी तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले आहे.

जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा काय होते?

सीडीसीच्या मते, उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे सामान्यत: गंभीर समस्या निर्माण होईपर्यंत दिसून येत नाहीत.हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी मोजणे. कोलेस्टेरॉलची काळजी न घेतल्यास त्याचा थर शिरांमध्ये जमा होऊ लागतो. हे हृदयाला नुकसान पोहोचवते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

( हे ही वाचा: Weight Loss: उपाशीपोटी लसणाचे सेवन केल्याने वजन झपाटयाने कमी होते; पण ‘या’ महत्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवा)

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जेव्हा कोलेस्टेरॉलचा प्रश्न येतो तेव्हा अशी काही लक्षणे असतात ज्यांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. जसे की,

  • मळमळ
  • शरीर सुन्न होणे
  • प्रचंड थकवा येणे
  • छातीत अचानक दुखणे
  • श्वासोच्छवासाचा त्रास
  • हात-पाय थंड होणे
  • उच्च रक्तदाब

अशी लक्षणे सहसा उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असतात. त्यामुळे गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार सुरू करा.

( हे ही वाचा: दुधाचा चहा पिणे शरीरासाठी किती चांगले आणि किती वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

लक्षणे दिसतात तेव्हा काय करावे?

तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा आणि त्यांना समस्येबद्दल कळवा. ही अशी वेळ आहे जेव्हा आपल्याला शक्य तितक्या लवकर निदान करणे आवश्यक आहे. कारण जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार केले जाऊ शकतात. डॉक्टर सहसा यासाठी चाचणीचे आदेश देतात. ही एक रक्त तपासणी आहे आणि याद्वारे तुमच्या शरीरात काही चुकीचे नाही हे कळू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले तर लगेच ही चाचणी करावी.

४५ वर्षांनंतर चाचणी आवश्यक आहे

नॅशनल हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) ने शिफारस केली आहे की ४५ ते ६५ वयोगटातील पुरुष आणि ५५ ते ६४ वयोगटातील महिलांनी दर एक ते दोन वर्षांनी रक्त तपासणी करावी. जर तुमचे वय ६५ पेक्षा जास्त असल्यास, तज्ञ म्हणतात की तुम्ही दरवर्षी तुमच्या कोलेस्टेरॉलची चाचणी घ्यावी.

( हे ही वाचा: Side Effects of Paneer: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नका पनीर; आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

चाचणीशिवाय कोलेस्टेरॉल वाढले आहे हे कसे समजून घ्यावे?

समस्या अशी आहे की शरीराला कोलेस्टेरॉलची वाढ लक्षात येत नाही जोपर्यंत काही गंभीर समस्या उद्भवत नाहीत. ११ ते ५५ वर्षे वयापर्यंत दर पाच वर्षांनी तुमची फोर्स लिपिड टेस्ट करून घ्यावी, हे डॉक्टरही सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What quickly reduces cholesterol these 7 symptoms if increased heart attack risk gps