मधुमेह हा एक सामान्य आजार होत चालला आहे. जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक या आजाराच्या विळख्यात आहेत. एकदा का या आजाराने ग्रासले की आयुष्यभर तो साथ सोडत नाही. मधुमेह हा असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. मात्र त्याला नियंत्रित केले जाऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मधुमेहासोबत अनेक नवीन आजारांना जन्म देऊ शकतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य आहार आणि व्यायामाने यावर नियंत्रण ठेवता येते.
साखर कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हानिकारक असली तरी वृद्धांना याचा जास्त धोका जास्त प्रमाणात असतो. त्यांच्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. वृद्धांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तर जाणून घेऊया वयाच्या ७० ते ८० व्या वर्षी रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे.
( हे ही वाचा: यूरिक अॅसिड वाढल्यास शरीर देऊ लागते संकेत; गंभीर आजार होण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय)
७० ते ८० या वयात रक्तातील साखरेची पातळी किती असावी?
आरोग्य तज्ञांच्या मते ७० ते ८० वयोगटातील लोकांची साखरेची पातळी १०० mg/dl ते १४० mg/dl दरम्यान असावी. या वयातील लोकांसाठी फास्टिंग शुगर लेवल उपवासातील १००mg/dl असावी आणि जेवणानंतर १४०mg/dl पर्यंत असावी. साखरेचे प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते.
रक्तातील साखर जास्त वाढल्यास ‘हा’ धोका उद्भवू शकतो
साखर सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर हृदयविकाराचा झटका आणि किडनी निकामी होण्याचा धोका असू शकतो. याशिवाय जर साखरेची पातळी जास्त राहिली तर शरीराच्या इतर अवयवांवर जसे डोळे, कान आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. दृष्टी कमी होऊ लागते याचा स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो.
( हे ही वाचा: लैंगिक संबंध ठरतंय गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण? दरवर्षी ६७ हजार महिलांचा होतो मृत्यू, अशाप्रकारे घ्या काळजी)
‘या’ गोष्टींचा आहारात समावेश केल्यास फायदा होईल
ज्यांची साखर नेहमी जास्त असते, त्यांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. गव्हाच्या पिठाचे सेवन साखरेच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत गव्हाऐवजी इतर धान्यांचा आहारात समावेश करण्याची गरज आहे.
चण्याचे पीठ
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर त्यांनी चण्याचे जास्त सेवन करावे. पोळी बनवण्यासाठी बेसनाचाही वापर करावा. यामध्ये असलेले खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
( हे ही वाचा: Late Night Eating Habit: तुम्हालाही अचानक मध्यरात्री भूक लागते का? ‘हे’ ४ उपाय करा, पोटही भरेल आणि वजनही नियंत्रणात राहील)
बाजरीचे पीठ
बाजरीच्या पिठात भरपूर फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यासोबतच शुगरच्या रुग्णांनी आपल्या आहारात दुधी भोपळा, टिंडा इत्यादी रसाळ भाज्यांचा समावेश करावा.