Blood Sugar Level Per Age Chart: वाढत्या वयानुसार आजारांचा धोकाही वाढत असतो, चाळीशी पार केल्यावर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते व मधुमेह, हृदयाचे विकार असे अनेक त्रास डोके वर काढतात. मधुमेहाचा त्रास तर अलीकडे तरुणांसहित लहान मुलांमध्येही दिसून येतो. वय वाढत जातं तसं हा आजार आणखीनच बळावतो. जर आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर शरीर ऍक्टिव्ह राहणे खूप गरजेचे आहे. तणाव न घेता व आहारावर नियंत्रण ठेवून आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता, यासाठी रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
Weight Loss: वजन कमी करायचंय तर आहारात ‘या’ पाच ‘लाल’ रंगाच्या पदार्थांचा समावेश हवाच
अलीकडे वर्क फ्रॉम होमसारख्या सुविधांमुळे एका जागी बसून काम अशा वाईट सवयी प्रत्येकाला लागत आहेत. यामुळे शरीर स्थूल होते व सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. यामुळे पुढे हृदय, किडनी, फुफ्फुसे व डोळ्यांचे विकारही होऊ शकतात. यामुळेच वयाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यायला हवे, त्यासाठी खाली दिलेला हा तक्ता आवर्जून पाहा.
वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती हवे?
वय | रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण | दुपारच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण | रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण |
६ ते १२ | ८० ते १८० mg/dl | १४० mg/dl | १०० ते १८० mg/dl |
१३ ते १९ | ७० ते २५० mg/dl | १४० mg/dl | ९० ते १५० mg/dl |
२० ते २६ | १०० ते १८० mg/dl | १८० mg/dl | १०० ते १४० mg/dl |
२७ ते ३२ | १०० mg/dl | ९० ते ११० mg/dl | १०० ते १४० mg/dl |
३३ ते ४० | १४० mg/dl | १६० mg/dl | ९० ते १५० mg/dl |
५० ते ६० | ९० ते १३० mg/dl | १४० mg/dl | १५० mg/dl |
Lumpy Skin Disease: लम्पी त्वचा रोग माणसांना होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे व उपाय
रक्तातील साखर तपासून घेण्याची योग्य वेळ
रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी सकाळी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या जेवणानंतर सकाळी चाचणी घेण्यामध्ये किमान ८ तासाचे अंतर असावे. सकाळी अनसे पोटी चाचणी घेतल्यास अधिक अचूक परिणाम दिसून येतो.