मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी योग्य पद्धतीने घ्यावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे या दिवसात घरा बाहेर पडताना ही खास काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला उष्मघाताचा त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात बाहेर जाताना या टिप्स करा फॉलो
उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणाच्या संपर्कात येण टाळावे. तसेच नागरिकांनी उन्हात जास्त न फिरता आपल्या शरीराच तापमान कसे थंड राहणार याची काळजी घ्यावी.
उन्हापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचा प्रमाण संतुलित ठेवावे. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे. तसेच शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.
कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोके झाकणे. त्यासोबतच गॉगल देखील लावा याने डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल.
उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे.
घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे.
घराबाहेर जाताना तुमच्या जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगा.
वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत/ आंबत यामुळे तुम्ही ऑफिसला किंवा शाळा, कामाच्या ठिकाणी डबा खातांना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे.
एसीमध्ये काम करणार्यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते. त्यामुळे एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ एखाद्या जागेवर बसून घ्या.
उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करणे.
उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मध्ये जाऊन बसु नये.