High Blood Pressure: सध्या अनेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या सतावत आहे. बिघडलेली जीवनशैली किंवा अपुरा आहार यामुळे देखील उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर आपली जीवनशैली चांगली असेल तर आपण या त्रासापासून सुटका मिळवू शकतो किंवा त्याला नियंत्रित करू शकतो.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टरांच्या मते, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधांसोबतच अनेक घरगुती उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे वाढलेला बीपी नियंत्रित करू शकता. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला जाग येण्याच्या काही तास आधी रक्तदाब वाढू लागतो. तो दिवसा वाढत राहतो आणि दुपारी जास्तच पातळीला पोहोचतो. रक्तदाब सहसा दुपारी आणि संध्याकाळी कमी होतो. रात्री झोपताना रक्तदाब कमी होतो.

‘या’ गोष्टींमुळे वाढू शकतो ब्लड प्रेशर

पुरेशी झोप न मिळणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, धूम्रपान, ताणतणाव आणि नियमित आणि संतुलित आहार वेळेवर न घेणे. मधुमेहामुळे रक्तदाबही वाढतो.

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय

डॉक्टरांच्या मते, जर तुमचा रक्तदाब जास्त असेल तर तुमचे वजन संतुलित ठेवा, धूम्रपान करू नका, पुरेशी झोप घ्या आणि नियमित व्यायाम आणि योगासने करा. फळे आणि दही खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो. तसेच प्रथिने आणि कॅल्शियमचे सेवन करा.

उच्च रक्तदाबाची लक्षणे

तीव्र डोकेदुखी, अति थकवा, श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे यासारख्या समस्या उच्च रक्तदाबामुळे होतात. असे झाल्यावर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्ही नियमित तपासणी आणि संतुलित आहार आणि योगासने तुमच्या वाढलेल्या बीपीवर नियंत्रण ठेवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What time of day is blood pressure highest know which things increase bp gps