Benefits of Walking In The Morning: सकाळी वॉकला जाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात सकाळी फिरायला गेल्याने शरीरात साठलेली चरबी उर्जेत रूपांतरित होऊ लागते. हे कॅलरीज बर्न करण्यासदेखील मदत करते. चालण्याने ताण कमी होऊन निद्रानाशाची समस्याही दूर होते. पण, बऱ्याच वेळा लोक मॉर्निंग वॉकला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत गोंधळलेले असतात.

वजन कमी करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कधी चालावे?

तुम्ही चालण्यानेही तुमचे वजन कमी करू शकता, यासाठी तुम्हाला योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे. संध्याकाळी शरीराचे स्रायू अधिक सक्रिय असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी फिरायला जावे. पण, जर तुम्हाला तुमची झोप सुधारायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही सकाळी फिरायला जायला हवे.

वॉक करण्याची योग्य वेळ

सकाळी फिरायला गेल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उन्हाळ्यात सूर्योदयापासून सकाळी ७ वाजेपर्यंतचा काळ परिपूर्ण असतो. जर संध्याकाळबद्दल सांगायचे झाल्यास, सूर्यास्तानंतर फिरायला जावे. उन्हाळ्यात तुम्ही सकाळी ५ वाजता फिरायला जाऊ शकता आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर फिरायला जाणे चांगले राहील