Number Written In The Bottle: प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणण्याचे अनेक दावे केले जात असले तरी, तरीही प्रत्येक घरांमध्ये प्लास्टिकचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो, मग ते प्लास्टिकच्या बाटल्या असोत किंवा प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे लंच बॉक्स. आपल्या रोजच्या आयुष्यातून प्लास्टिक काढून टाकणे खूप कठीण आहे, पण त्याचे तोटे जाणून घेतल्यास, आपण निश्चितपणे त्याच्यापासून दूर राहाल. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तुम्हाला प्लास्टिकच्या बाटल्यांच्या मागील बाजूस लिहिलेल्या नंबरबद्दल सांगत आहे, ते तुम्हाला कसे सूचित करतात की ही प्लास्टिकची बाटली वापरण्यास योग्य आहे की अयोग्य?
प्लास्टिकच्या बाटल्यांवर लिहिलेले आकडे काळजीपूर्वक पाहा
एका तज्ञाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर guptarajat02 नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्यापूर्वी लक्षात घेण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, जर प्लास्टिकची बाटली किंवा कंटेनरच्या मागे १,३, ६ किंवा ७ नंबर लिहिलेले असतील तर तुम्ही या बाटल्या किंवा कंटेनर फक्त एकदाच वापरू शकता. त्यात असे केमिकल आढळून येते ज्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो आणि त्याचा परिणाम हळूहळू होतो.
याशिवाय या व्हिडीओमध्ये बाटली किंवा कंटेनरच्या मागे २, ४, किंवा ५ नंबर लिहिलेले असल्यास ही बाटली पुन्हा वापरण्यास सुरक्षित आहे, असेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. परंतु फक्त ४ ते ५ महिन्यांसाठी वापरू शकता. यानंतर या बाटल्या किंवा कंटेनर टाकून द्याव्यात.
हेही वाचा – Monsoon Makeup : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स करा ट्राय! मिळेल हटके लूक
तज्ज्ञांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
प्लास्टिकच्या बाटल्यांमागील नंबरची माहिती देणाऱ्या या तज्ज्ञांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून दीड लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. ही टिप्स शेअर केल्याबद्दल काही युजर्स त्यांचे आभारही मानत आहेत आणि अनेक जण असेही म्हणत आहेत की ज्या बाटल्यांवर नंबर लिहिलेला नाही त्यांचे काय करावे? त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले कीप्लास्टिकप्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी तांब्याच्या बाटल्यांचा वापर सुरू करा.