धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. जिथे सनातन धर्मात तिला देवीची उपाधी मिळाली आहे तिथे तिला आयुर्वेदात ‘औषधींची राणी’ असेही म्हणतात. वर्षानुवर्षे घराघरात त्याची पूजा केली जात आहे आणि संसर्ग टाळण्यासाठी त्याची पाने औषध म्हणूनही वापरली जात आहेत. अशा परिस्थितीत साधारणपणे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आपल्या कुंडीत लावलेली तुळस पुन्हा पुन्हा कोमेजते याचाही अनेकांना त्रास होतो. कितीही पाणी टाकले तरी ते सुकते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुळशीचे रोप दीर्घकाळ हिरवे ठेवता येईल. तसेच, जर तुळस आधीच सुकलेली असेल तरीही ती पुन्हा बहरेल.

तुळस वारंवार का सुकते?

वारंवार तुळस सुकण्यामागे अनेक कारणे असून शकते. यामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी, खत टाकणे किंवा कमी ऊन मिळणे मुख्यत: समाविष्ट असते. त्यशिवाय किड लागल्यामुळे देखील तुळस सुरकू लागते.

सुकलेल्या तुळशीच्या रोपाला पुन्हा हिरवेगार कसे करावे?

तुळस पुन्हा हिरवीगार दिसण्याची शक्यता तेव्हा जास्त असते तेव्हा त्याचे देठामध्ये ताजेपणा शिल्लक असतो. अशा स्थितीमध्ये तुळस पुन्हा हिरवीगार करण्यासाठी तुम्ही शेण आणि कडूलिंबचा पाला वापरू शकता.

पण हे एका खास पद्धतीने वापरावे लागते. त्यासाठी शेण आधी सुकवा आणि मग त्याचा चुरा तयार रोपाच्या मातीत टाका. कडूलिंबची पाने देखील व्यवस्थित सुकवून त्याचे पावडर तयार करून मातीत टाका. असे केल्याने पोषकतत्व मुळांपर्यंत पोहचतात आणि रोप पुन्हा हिरवे दिसू लागते.

हेही वाचा – कंबरेपर्यंत केस वाढवायचेत? स्वयंपाकघरात असलेल्या फक्त ‘या’ ३ गोष्टी वापरा, केस होतील लांब

तुळशीच्या रोपाला किती पाणी टाकावे?

तुम्ही जर नेहमी आपल्या घरामध्ये तुळशीच्या रोपाला हिरवेगार पाहू इच्छित असाल तर त्यामध्ये खूप नियंत्रित प्रमाणात पाणी टाका. म्हणजे रोपाला पुन्हा पाणी तोपर्यंत टाकू नका जोपर्यंत कुंडीतील माती पूर्ण सुकत नाही. पावसाळ्यात रोपांना पाणी टाकण्याचे प्रमाण आणखी कमी असले पाहिजे.

कोणत्याही ठिकाणी तुळस ठेवली पाहिजे

तुळस सुर्यकिरणांमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढते. चांगल्या वाढीसाठी तुळशीच्या रोपाला ६-८ तास ऊन मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मोकळ्या जागी तुळस ठेवली पाहिजे जेणेकरून तिच्या गरजा पूर्ण होतील.

हेही वाचा – पहिल्यांदा बिकिनी व्हॅक्स करण्याचा विचार करत आहात? मग तुम्हाला ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहित असल्याच पाहिजेत

​या गोष्टी लक्षात ठेवा

  • आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा
  • कुंडी बदलताना ज्याच्या मुळांना सावधगिरीने काढा
  • पानांना छिद्र असेल तर पाणी आणि एक चमचा डिश डिक्विड टाकून पेस्ट कंट्रोल करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do if tulsi plant is drying know the home remedies for dying plants snk