How To Increase Deep Sleep: हल्ली अनेक जण निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. रात्री झोप न मिळाल्याने दिवसभर आळस जाणवतो. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी रात्री गाढ झोप येण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. त्यांच्या मदतीने तुम्ही रात्री चांगले निवांत झोपू शकता.
झोप न येण्याची कारणे आणि उपाय
निद्रानाश गंभीर समस्येत बदलू शकतो. तणाव आणि चिंता यांमुळे झोप कमी होते. अनेकदा लोकांची दिनचर्या अनियमित असते; ज्यात आहाराची वेळ, झोपेची वेळ आदी सर्व गोष्टी चुकीच्या वेळी केल्या जातात. त्यामुळे झोप न येण्याचे हेही प्रमुख कारण असू शकते. तसेच आजकाल बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, कोल्डड्रिंक घेतात. त्यामुळे झोपेवर खूप दुष्परिणाम होतो आणि त्याच्या सेवनामुळे अनेक तास झोप येत नाही. बरेच लोक रात्री जड आहार घेतात आणि मग त्यामुळे त्यांना झोप येत नाही. अशा परिस्थितीत झोपण्याच्या तीन-चार तास आधी अन्न घेतले पाहिजे.
लगेच झोप येण्यासाठी काय करावे?
- झोप येण्यासाठी वेळेवर झोपा आणि दररोज एकाच वेळी जागे व्हा. ही तुमची नित्याची बाब तुमच्या शरीराचे घड्याळ ‘सेट’ करेल आणि त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ लागेल.
- झोपण्याच्या किमान एक तास आधी तुमचा मोबाईल, लॅपटॉप वापरू नका.
- रात्री झोपण्याआधी कोणतेही अन्न खाणे टाळा. झोपण्याच्या सुमारे ३-४ तास आधी अन्न खा.
- झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट दूध पिऊ शकता. त्यामध्ये अनेक घटक असतात, जे झोप आणण्यासाठी अधिक चांगले असतात.