सरकारकडून आधार पॅन लिंक करण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत पॅन लिंक करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली होती. आता आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल. सर्वप्रथम तुमचा पॅन निष्क्रिय होईल. एकदा का पॅन निष्क्रिय झाला की, तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेत खाते उघडणे, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करता येणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अधिक टीडीएस भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही अजूनही पीएफचे पैसे काढत असाल, तर पॅन लिंक नसल्यास भरपूर टीडीएस कापला जाईल. पॅन लिंक केलेल्या खातेधारकांकडून १० टक्के टीडीएस कापला जातो. परंतु ज्यांच्याकडे पॅन लिंक नाही त्यांच्याकडून तिप्पट टीडीएस वसूल केला जातो.

कर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकदा का पॅन निष्क्रिय झाला, तर पॅन नंबर नाही असे गृहीत धरले जाईल. तसेच आयकर कायद्यांतर्गत दंड भरण्यास जबाबदार धरलं जाईल. १९६१ कलम २७२ (बी) नुसार पॅन सादर करू न शकल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाईल. तथापि, दंड भरून अंतिम मुदत संपल्यानंतर एखादी व्यक्ती आधारशी पॅन लिंक करू शकते. आयकर कायद्याच्या कलम २३४ (एच) अंतर्गत दंड आकारला जाईल. सरकारने अद्याप दंडाची रक्कम जाहीर केलेली नसली तरी, मुदत संपल्यानंतर पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी कमाल रक्कम १,००० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. एकदा दंड भरला की, पॅन पुन्हा एकदा कार्यरत होईल आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी पॅनशी लिंक केल्यास दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नव्हती. वित्त कायदा, २०२१ पारित करताना आयकर कायद्यात कलम २३४ (एच) जोडल्यानंतर १ एप्रिल २०२१ पासून दंडाची तरतूद लागू झाली.

Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
surya gcoahr 2024
२३ दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; मकर राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
shukra rashi parivartan 2024
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिळणार श्रीमंत होण्याची संधी
free aadhaar card update process in marathi
Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता १४ जूनपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा मोजावे लागतील पैसे

आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य का आहे?
२०१७ च्या अर्थसंकल्पात पॅन नंबर आधारशी लिंक करण्याचा कायदा पारित करण्यात आला. यासाठी आयकर कायद्यांतर्गत नवीन कलम १३९एए जोडण्यात आले. १ जुलै २०१७ रोजी पॅन वाटप करण्यात आलेल्या आणि आधार क्रमांक मिळवण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पॅन आधारशी लिंक करावा लागेल. मुदतीपूर्वी पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय होईल. आयकर रिटर्न भरताना आणि १३९एए अंतर्गत नवीन पॅनसाठी अर्ज करताना आधार क्रमांक नमूद करणं अनिवार्य आहे.

पॅनकार्डबाबत या चुका करू नका!, अन्यथा भरावा लागेल १० हजारांचा दंड

आधारशी पॅन लिंक करण्याचे मार्ग
पॅनला आधारशी लिंक करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट देऊन, एसएमएस पाठवून किंवा फॉर्म भरून एखादी व्यक्ती पॅनला आधारशी लिंक करू शकता.

  • तुम्ही आयकर विभागाच्या साईटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे. https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करता येईल.
  • ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.
  • ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.
  • ही माहिती भरुन झाल्यानंतर खाली कोड दिलेला असेल ज्याला Captcha Code असं म्हणतात. तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.
  • ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊ जाईल.

Story img Loader