सरकारकडून आधार पॅन लिंक करण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत पॅन लिंक करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली होती. आता आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल. सर्वप्रथम तुमचा पॅन निष्क्रिय होईल. एकदा का पॅन निष्क्रिय झाला की, तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेत खाते उघडणे, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करता येणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अधिक टीडीएस भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही अजूनही पीएफचे पैसे काढत असाल, तर पॅन लिंक नसल्यास भरपूर टीडीएस कापला जाईल. पॅन लिंक केलेल्या खातेधारकांकडून १० टक्के टीडीएस कापला जातो. परंतु ज्यांच्याकडे पॅन लिंक नाही त्यांच्याकडून तिप्पट टीडीएस वसूल केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा