मोबाईल वापरणाऱ्यांपैकी सर्वाधिक जणांकडे सध्या स्मार्टफोन आणि त्यावर व्हॉटसअॅप असतेच. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सगळेजण व्हॉटसअॅपवर अॅक्टीव्ह असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या यूजर्सचा वापर अधिकाधिक सोयीचा व्हावा आणि त्यांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी अॅप्लिकेशनमध्ये अनेक बदल कऱण्यात येत आहेत. अॅप्लिकेशनमध्ये झालेले हे बदल जाणून घेतल्यास आपलाही वापर अधिक सुकर होऊ शकतो. काय आहेत हे नवे बदल जाणून घेऊया…

१. रंगीत टेक्स्ट आणि स्टेटस ठेवता येणार

व्हॉटसअॅपने आपल्या आयओएस आणि अॅंड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फीचर लाँच केले आहे. यामाध्यमातून आता आपण फेसबुकप्रमाणे रंगीत बॅगराऊंडचे स्टेटस अपडेट करु शकता. हे रंगीत स्टेटस टाकायचे असेल तर आपल्याला स्टेटस टॅबवर जावे लागेल. उजव्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्यावर पेनचा आयकॉन आहे. यावर क्लिक केल्यावर आपल्याला हा रंगीत स्टेटसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खालच्या बाजूला रंग आणि टेक्स यांचे पर्याय असतील, याबरोबरच स्मायलीचेही पर्याय असतील. याव्दारे तुम्हाला हवे तसे स्टेटस तुम्ही तयार करु शकणार आहात. हे नवीन फीचर आपल्यापर्यंत यायला आणखी काही कालावधी लागू शकतो.

२. टेक्स्ट स्वरुप बदलता येणार

आपण लिहित असलेल्या मेसेजमधील कोणताही शब्द आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचा असल्यास आधीही तो पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे करणे आणखी सोपे झाले आहे. ज्या शब्दाला बोल्ड करायचे आहे त्यावर काही वेळ क्लिक केल्यास हा शब्द रंगीत करणे, बोल्ड करणे, इटॅलिक करणे, विशिष्ट शब्दावर काट मारणे असे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

३. इमोजी शोधणे होणार आणखी सोपे

सध्या व्हॉटसअॅपमध्ये अनेक इमोजी देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी यामध्ये वाढही करण्यात आली. आता यामध्ये एखादा शब्द लिहिला की त्या संदर्भातली इमोजी तुम्हाला दिसू शकणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्या शब्दाशी निगडीत सर्व इमोजी दिसतील. त्यातील तुम्हाला हवी ती इमोजी शोधणं सोप्प होणार आहे. सध्या हे केवळ इंग्रजी शब्दांसाठीच मर्यादीत आहे. तुम्ही crying असे लिहिल्यास रडण्याशी निगडीत अनेक इमोजी तुम्हाला तिथे दिसू शकतील.

४. GIF फिचर

टेक्स्ट आणि इमोजी याशिवाय व्हॉटसअॅपनं GIF पाठवण्याचा पर्यायही काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिला होता. तेव्हा या फिचर्समुळे युजर्सना वेगळ्या फीचर्सचा लाभ घेता आला.

५. फोन बदलला तरीही जुने चॅट मिळू शकणार

तुम्ही जर जुना मोबाईल बदलण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या व्हॉटसअॅपमधील डेटा तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी उत्तम पर्याय देण्यात आला आहे. यातही तुम्ही अॅंड्रॉईडवरुन आयफोनवर स्विच होणार असाल तर तुमच्या जुन्या फोनमधील चॅटहीस्ट्री तुम्ही नवीन फोनमध्ये घेऊ शकता. तुमच्या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा ऑप्शन असेल तर मेन्यू-सेटींग्ज-चॅट सेटींग्ज या पर्यायावर क्लिक करून बॅकअप कॉन्व्हरसेशनवर क्लिक करुन तुमच्या जुन्या व्हॉटसअॅप मेसेजेसचा बॅकअप घेता येणार आहे. हे कार्ड नव्या फोनमध्ये टाकल्यानंतर व्हॉटसअॅप इन्स्टॉल करुन सिस्टोअरचा पर्याय निवडल्यावर जुने सर्व चॅट तुम्हाला नवीन फोनमध्ये मिळू शकतील.

Story img Loader