सध्याच्या युगातील संवादाच्या लोकप्रिय माध्यमांपैकी एक म्हणून व्हॉटसअॅपकडे पाहिले जाते. एरवी व्हॉटसअॅप खूपच फायदेशीर ठरत असले तरी अनेकदा त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. कधीकधी आपण व्हॉटसअॅपवरून चुकून भलत्याच व्यक्तीला मेसेज पाठवतो. ती व्यक्ती आपला मित्र किंवा मैत्रीण असेल तर यामुळे निर्माण होणारा गोंधळ थोडक्यात निभावतो. मात्र, कुणा तिऱ्हाईत व्यक्तीला असा चुकीचा मेसेज गेल्यास वाईट अनुभव येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी चूक घडल्यानंतर हा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच डिलिट किंवा अनसेंड करता आला तर, असा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल. लवकरच तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आगामी काही दिवसांत व्हॉटसअॅपवर एक नवीन फीचर उपलब्ध होणार आहे. ‘डिलीट फॉर एवरीवन’ असं या फीचरचं नाव असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंडिपेन्डट’ने दिलेल्या माहितीनुसार, जर अनावधानाने एखाद्या ग्रुपमध्ये किंवा व्यक्तीला मेसेज गेले तर पाच मिनिटांच्या आत युजरला या फीचरमुळे ते मेसेज अनसेंड करता येतील. फक्त टेक्स्ट मेसेजच नाही तर फोटो, डॉक्युमेंट, व्हिडिओ, जीआयएफ देखील अनसेंड करता येणार आहे. पण समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज लगेच वाचला तर मात्र तुमच्याकडे काहीच पर्याय नसेल.  या फीचरची यशस्वी चाचणी झाली असून लवकरच युजरला या फीचरचा लाभ घेता येणार आहे. व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘व्हॉट्सअॅप डिलीट फॉर एव्हरीवन फीचरचं काम करत आहे. यामुळे पाठवण्यात आलेले मेसेज रिकॉल केले जात आहेत. कोणताही गाजावाजा न करता हे फीचर सुरु करण्यात येणार असून लवकरच युजर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे’.

जगभरात सध्याच्या घडीला व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या ही १२० कोटींच्या घरात आहे. २००९ साली सुरु करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप या कंपनीला २०१४ साली फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून विकत घेतले होते.