WhatsApp ने आता आपल्या युझर्ससाठी एक नवं फिचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने जाहीर केलं आहे की युझर्सना आपली संपूर्ण व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्री iOS आणि Android फोन दरम्यान मूव्ह करता येऊ शकते. युझर्स आपल्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बदल करून आपल्या व्हॉइस नोट्स, फोटोज आणि संभाषणे मूव्ह करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपचे प्रॉडक्ट मॅनेजर संदीप परचुरी यांनी याबाबत सांगितलं कि, “आम्ही आमच्या युझर्सना पहिल्यांदाच त्यांची व्हॉट्सअ‍ॅप हिस्ट्री एका ऑपरेटिंग सिस्टीमवरून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सुरक्षितपणे ट्रान्सफर करणं सोपं व्हावं यासाठी एक फिचर उपलब्ध करून देत आहोत. आम्ही यासाठी उत्सुक आहोत. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रणालींच्या युझर्ससाठी उपलब्ध असेल. याचाच अर्थ असा की व्हॉट्सअ‍ॅप युझर्स आता अँड्रॉइडवरून आयओएस किंवा उलट आयओएसवरून अँड्रॉइडवर स्विच करू शकतात.

या फोन्समध्ये उपलब्ध होणार WhatsApp चं ‘चॅट हिस्ट्री’ फीचर

WhatsApp चं हे चॅट हिस्ट्री फीचर सर्वप्रथम येत्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाईल. परंतु, जर तुम्हाला हे फिचर आता वापरायचं असेल तर तुम्हाला सॅमसंगचे नुकतेच लॉंच झालेले फोल्डेबल फोन खरेदी करावे लागतील. कारण या फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा हा चॅट हिस्ट्री सपोर्ट आधीच उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपने केलेल्या घोषणेनुसार, सॅमसंगने कालच (११ ऑगस्ट) आपले नवीन गॅलेक्सी झेड फोल्ड ३ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ३ हे स्मार्टफोन्स लॉंच केले आहेत.

कंपनीने म्हटलं होतं कि, “व्हॉट्सअ‍ॅपचं हे चॅट हिस्ट्री फीचर सुरुवातीला अँड्रॉइडवर आणि सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी फोनवर सुरू होईल. जे ११ ऑगस्ट रोजी लॉंच होतील.” पुढे व्हॉट्सअ‍ॅपने असंही नमूद केलं आहे की, हे चॅट हिस्ट्री फीचर अँड्रॉइड १० किंवा हाय व्हर्जन्समध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. कंपनीने याबाबत सांगितलं होतं कि, “जगभरातील युझर्स आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटला सॅमसंग डिव्हाइसवर नेण्यासाठी हे फिचर वापरू शकतात. जे येत्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड १० किंवा हायर व्हर्जन्सवर उपलब्ध होणार आहे.”

Story img Loader