जगातील प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअॅपचा वापर करताना दिसून येतो. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता वाढली हे मात्र नक्की. म्हणूनच व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना नवनव्या गोष्टी देत असतं. विविध फिचर आणत असतं. व्हॉट्सअॅप हे सुरक्षित असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. पण काही जणांना व्हॉट्सअॅपवरील आपला प्रोफाइल फोटो त्यांच्या परवानगीशिवाय कुणी पाहू नये, असं वाटत असतं. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने एक कमालीचं फिचर आणलंय.
WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप एका नव्या फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो काही लोकांपासून हाइड करून ठेवू शकता. याचाच अर्थ असा की, तुमचा व्हॉट्सअॅपवरील प्रोफाइल फोटो तेच लोक पाहू शकतील, ज्यांनी तुमचा प्रोफाइल फोटो पाहिलेलं चालणार आहे. म्हणजेच प्रोफाइल फोटोचं पूर्णपणे कंट्रोल तुमच्याच हातात असणार आहे.
असं काम करणारे हे नवं फिचर
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नवे प्रायव्हसी फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमध्ये युजर्स त्यांच्या प्रोफाइल फोटोमधून काही लोकांना हाइड करू शकतात. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप कंपनीने या नव्या फिचकवर काम करण्यास सुरूवात देखील केलीय. या प्रायव्हसी फिचरमध्ये युजर्ससाठी चार पर्याय देण्यात येणार आहेत. यात Everyone, My contacts, Nobody आणि My contacts except यांचा समावेश असणार आहे. या पर्यायांचा वापर करत तुम्हाला काही निवडक लोकांपासून तुमचा प्रोफाइल फोटो हाइड करता येणार आहे.
या नव्या प्रायव्हसी फिचरमध्ये जर तुम्ही Everyone हा पर्याय ठेवत असाल तर सर्वच जण तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकतील. जर My contacts हा पर्याय ठेवला तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असलेले युजर्स हेच तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकणार आहेत. याशिवाय जर तुम्ही Nobody हा पर्याय ठेवला तर कुणीच तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकणार नाहीत. शेवटचा पर्याय My contacts except हा पर्याय ठेवला तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असलेल्या युजर्सपैकी ज्यांना तुम्हाला हा प्रोफाइल फोटो दाखवायचा आहे, त्यांनाचा सिलेक्ट करता येऊ शकतं.