काही ठराविक कंपनीच्या हँडसेटमध्ये व्हॉट्स अॅप हे जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप १ डिसेंबर २०१८ पासून बंद होणार आहे. यात ब्लॅकबेरी OS BlackBerry OS, ब्लॅकबेरी १० BlackBerry 10, आणि विंडो फोन ८.० यांचा समावेश आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत पोस्टमार्फत ही माहिती दिली आहे.
२०१६ मध्ये या सर्व फोनमध्ये व्हॉटस अॅप सपोर्ट करणार नसल्याचे कंपनीनं जाहीर केले होते. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ रोजीच या फोनमध्ये व्हॉट्स अॅपची सेवा बंद होणार होती. पण कंपनीनं ही मुदत वाढवून ३० जून २०१७ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कंपनीकडून ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ करण्यात आली होती. तेव्हा आता ही मुदत संपली असून नोकियाची एस ४० सिरीज, नोकिया सिम्बियन एस ६०, अँड्रॉइड २.१, अँड्रॉइड २.२ आणि विंडोज फोन आणि ब्लॅकबेरीमधली व्हॉट्स सेवा कायमस्वरूपी खंडीत होणार आहे.