जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी प्रत्येकजण पितो, पण तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित आहे का, आणि तुम्ही ज्या पद्धतीने पाणी पितात आणि ते पिण्याची योग्य वेळ योग्य आहे का? तुम्ही ऐकले असेल की आपल्या शरीरात सर्वात जास्त पाणीच असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की योग्य वेळी पाणी पिऊन तुम्ही लठ्ठपणा, डोकेदुखी आणि पचन यांसह अनेक समस्यांवर मात करू शकता. याबाबत नेफ्रोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. उमेश कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पाणी पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ सांगितली.
पाणी पिण्याची गरज का आहे?
आपल्या शरीरातील ७५ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. लहान मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. दुसरीकडे, कमी पाणी पिल्याने, आपण डिहायड्रेशनचे शिकार होतो, ज्यामुळे आपल्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. वयोवृध्द लोकांना कमी पाणी प्यायल्याने अनेक वेळा ऍडमिट देखील व्हावे लागते.
( हे ही वाचा: Curd In Winter: हिवाळ्यात दही खावं की नाही? काय सांगत आयुर्वेद आणि विज्ञान)
तुम्ही किती पाणी पिता?
डॉक्टरांच्या मते, पाण्याचे कोणतेही निश्चित प्रमाण नसते, ते वेळ, ठिकाण, ऋतूनुसार कमी-जास्त असू शकते. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने नेहमी पाण्याची बाटली स्वतःजवळ ठेवावी, जेणेकरुन तुम्हाला तहान लागल्यावर पाणी पिता येईल. तुम्हाला एकाच वेळी तीन ते चार ग्लास पाणी पिण्याची गरज नाही, काही तासांनी पाणी पित राहा.
झोपेतून उठल्याबरोबर पाणी का प्यावे?
डॉक्टरांनी सांगितले की रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर किमान एक ग्लास पाणी प्यावे. असं न केल्यास रक्त घट्ट होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
( हे ही वाचा: Uric Acid: जेव्हा यूरिक अॅसिडची पातळी १० mg/dL पेक्षा जास्त होते, तेव्हा शरीर देऊ लागते ‘या’ प्रकारचे भयंकर संकेत)
व्यायाम करतानाही पाणी प्यावे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वर्कआउट करताना आपल्याला खूप घाम येतो, त्यामुळे वर्कआउट करताना थोडेसे पाणी प्यावे आणि नंतरही भरपूर पाणी प्यावे.
गरम पाणी प्यावे की थंड?
डॉक्टर म्हणाले की, उन्हाळ्यातही गरम पाणी पिण्याची गरज नाही, तुम्ही सामान्य तापमानाचे पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी नक्कीच नुकसान करते. त्यामुळे ते पिणे टाळावे. हिवाळ्यात तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता.
( हे ही वाचा: Uric Acid: जास्त पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकते का? गाउट अटॅक कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या)
कोणत्या गोष्टींनंतर पाणी पिऊ नये?
डॉक्टरांनी सांगितले की, फळामध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे भात बनवल्यास ते भरपूर पाणी शोषून घेते, त्यामुळे भात खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. अर्धा तास थांबल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.