मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा असा आहे! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर आणि घरा सभोवतालचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर पाणी मारून, शेण सारवून रांगोळी काढली जाते. सर्वजण अभ्यंग स्नान करून नवे कपडे परिधान करतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे मानले जाते. भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी सासरी गेलेल्या मुली या दिवशी माहेरी येतात. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा