When is Diwali 2024: हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख-समृद्धीची देवता श्री गणेशाची पूजा केली जाते. या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतो. तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो. यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशीपासून भाऊबीज कधी आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. दरम्यान, यावर्षी २०२४ ची दिवाळी कधी आहे? तारीख आणि वेळ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. दिवाळी आश्विन आणि कार्तिक या हिंदू चंद्रमासांमध्ये साजरी केली जाते, जी सामान्यत: मध्य ऑक्टोबर आणि मध्य नोव्हेंबरदरम्यान येते. प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते; तर २०२४ मध्ये दिवाळी (लक्ष्मी पूजन) शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. पंचांगानुसार सर्वात शुभ वेळ संध्याकाळी ५:३६ ते संध्याकाळी ६:१६ दरम्यान आहेत.

दिवसदिवाळी २०२४तारीख
दिवस पहिलाधनतेरस२९ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार)
दिवस दुसराकाली चौदस ऑक्टोबर 30, 2024 (बुधवार)
दिवस तिसरानरक चतुर्दशी३१ ऑक्टोबर २०२४ (गुरुवार)
दिवस चौथादिवाळी (लक्ष्मी पूजन)१ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार)
दिवस पाचवागोवर्धन पूजा२ नोव्हेंबर २०२४ (शनिवार)
दिवस सहावाभाऊबीज३ नोव्हेंबर २०२४ (रविवार)

२०२४ मध्ये, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आणि ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी छोटी दिवाळी दरम्यान एक दिवसाचे अंतर असेल. हा क्रम द्रिक पंचांगने तपशीलवार सांगितल्याप्रमाणे हिंदू चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे.

प्रदोष काल: संध्याकाळी ५:३६ ते रात्री ८:११
वृषभ काल : संध्याकाळी ६:२० ते रात्री ८:१५ पर्यंत
अमावस्या तिथीची सुरुवात: ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३:५२ वाजता
अमावस्या तिथी १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:१६ वाजता संपेल.

दिवाळी का साजरी केली जाते? इतिहास आणि महत्त्व

दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात. हा एक प्रमुख हिंदू सण आहे, ज्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृद्धी, वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली.

Story img Loader