Krishna Janmashtami 2022: श्रावण महिन्यात अनेक मोठे सण येतात. त्यापैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी आणि रोहिणी नक्षत्रात झाला होता. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची म्हणजेच लाडू गोपाळाची पूजा केली जाते. या दिवशी उपवासही केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी असते?
यावर्षी 18 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते.
जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त
जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी १२.०५ ते १२.५६ पर्यंत अभिजीत मुहूर्त राहील. तर, ध्रुव योग १८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४१ ते १९ ऑगस्ट रोजी रात्री ८.५९ पर्यंत असेल. तर १७ ऑगस्टला रात्री ८.५६ ते १८ ऑगस्ट रात्री ८.४१ पर्यंत वृद्धी योग आहे.
( हे ही वाचा: Krishna Janmashtami 2022: मोरपंख, लोणी ते बासुरी, यंदा जन्माष्टमीच्या आधी घरी आणा ‘या’ वस्तू; जाणून घ्या कसा होईल लाभ)
जन्माष्टमी पूजा विधी
सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घरातील मंदिरात स्वच्छता करावी. घरातील मंदिरात दिवा लावावा. जन्माष्टमीला श्रीकृष्णाला श्रुंगार केल्यानंतर अष्टगंध, कुंकुवाचा तिलक लावावा. त्यानंतर माखन मिश्री आणि इतर नैवेद्याचे पदार्थ अर्पण करावे. त्यांनतर श्रीकृष्णाच्या विशेष मंत्राचा जप करावा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यात पंचामृत अर्पण करावी. त्यात तुळशीची पाने घाला. पुरणाचा नैवैद्य या पूजेला करू शकता. काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा नैवैद्यही दाखविला जातो. या दिवशी श्रीकृष्णाला सर्व प्रकारचे पदार्थ असलेले संपूर्ण सात्विक अन्न अर्पण केले जाते. या दिवशी रात्रीच्या पूजेला महत्त्व आहे, कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री झाला होता. विसर्जनासाठी फुले तांदूळ मूर्तीवर अर्पण करावे आणि शेवटी प्रसादाचे वाटप करावे.
जन्माष्टमीचे महत्त्व
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांपैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी एक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा-अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.