Tulsi Care Tips: उन्हाळा सुरू होताच त्याचा परिणाम सर्व मानवजातीवर, प्राण्यांवर आणि वनस्पतींवर होऊ लागतो. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यामुळे तुळशीचे रोपही कोमेजू लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला या दिवसात तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकू लागले तर काय करावे, या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
उन्हाळा सुरू होताच तुळशीचे रोप सुकू लागते. ते सुकू नये यासाठी तुम्ही मातीत मीठ आणि हळद मिसळा. असे केल्याने तुळशीच्या रोपातील बुरशीजन्य संसर्ग टाळता येतो.
तुळस कोमेजल्यावर काय करावे?
बऱ्याचदा तीव्र सूर्यप्रकाशामुळे रोप सुकू लागते. जर जमत असेल तर तिची जागा बदलून ते अशा ठिकाणी ठेवा, जिथे तिला हलका सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल. फक्त तीव्र सूर्यप्रकाश किंवा गरम वाऱ्यामुळे तुळस सुकते.
उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाला किती पाणी घालावे?
काही जण उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी देण्यास सुरुवात करतात. पण, तुम्ही पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त पाणी टाकल्याने तुळशीमध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्याच वेळी कमी पाणी ओतल्यास ते सुकू शकते.
अशी घ्या तुळशीची विशेष काळजी
उन्हाळ्यात तुळस सुकू नये म्हणून दर आठवड्याला तुळशीच्या रोपाची छाटणी करा. तुळशीच्या वरच्या फांद्या वेळोवेळी कापत राहा, असे केल्याने वनस्पती दाट होईल.