Coriander leaves: कोथिंबीर प्रत्येक भाजीचा स्वाद वाढवते. कोथिंबिरीच्या पानांतील सुगंध आणि चवीसह ही पाने पाचक रस वाढवण्यासही मदत करतात. कोथिंबिरीच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य गतिमान होते. त्याशिवाय या पानांचा वापर आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. पण, आपल्यापैकी अनेकांना भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची? ही एक गोष्ट ठाऊकच नसते. आज आम्ही तुम्हाला भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची आणि ती घालण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजीत कोथिंबीर कधी वापरायची?

भाजी शिजल्यावर लगेच कोथिंबीर घालावी. खरे तर यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भाजी बनवल्यानंतर लगेच त्यात कोथिंबीर घातली की, भाजी त्याची चव शोषून घेते आणि भाजीची वाफ त्याचा सुगंध पसरवते.

सर्व्ह करण्यापूर्वी या पदार्थांमध्ये कोथिंबीर घाला

डाळ बनवून झाल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी त्यात कोथिंबीर घाला. कारण- डाळीत आधीच कोथिंबीर घातली, तर सर्व्ह करण्यापूर्वी कोथिंबीर काळी पडते.

सर्व्ह करण्यापूर्वी सलाडमध्ये कोथिंबीर घाला.

सूप बनवतानाही सर्व्ह करण्यापूर्वी कोथिंबीर घाला.

हेही वाचा: आलं लवकर खराब होतं? दीर्घकाळ टिकवण्यासाठी ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

त्याशिवाय पालक आणि वांग्याच्या आमटीमध्ये कोथिंबीर घालण्याची काहीही आवश्यकता नाही. चव वाढवण्यासाठी तुम्ही धणे पावडर घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जेवणात कोथिंबिरीचा योग्य असा वापर करा.

तसेच भाजी किंवा डाळीसाठी कोथिंबीर वापरण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबिरीची मुळे कापून काढा आणि चाकूच्या मदतीने त्याचे छोटे तुकडे करून भाजीमध्ये टाका.