मैत्री हे एक सुंदर नातं आहे, जे तुम्हाला जन्मापासून मिळत नाही, ते आपण स्वतःसाठी निवडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं खूप खास असतं. खरा मित्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो. तुम्ही तुमची स्वप्ने आणि गुपिते खर्‍या मित्रासोबत शेअर करू शकता, ज्याबद्दल तुमच्या जवळच्या लोकांनाही माहिती नसते. ही मैत्री साजरी करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

पॅराग्वेमध्ये फ्रेंडशिप डे सुरू झाला. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम १९५८ मध्ये येथे मांडण्यात आला, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ३० जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच आजही ३० जुलैला अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण भारत, बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांसारखी राज्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. ओबरलिनमध्ये हा दिवस दरवर्षी ८ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

मैत्रीचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्याची भावना जिवंत ठेवण्यासाठी आणि मैत्रीचे क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी दरवर्षी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मैत्रीबद्दल त्यांच्या मित्रांचे आभार मानतात. ते एकमेकांना फ्रेंडशिप बँड घालतात आणि ही मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात. या दिवशी अनेक मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात आणि त्यांचे महत्त्व दर्शवतात. भारतात यंदा ७ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.

या दिवशी तुम्ही आपल्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला काही खास भेटवस्तू देऊन खुश करू शकता. पण जर तुम्हाला आपल्या मित्राला काय द्यावं हे समजत नसेल तर खालील पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात.

  • वायरलेस पॉवर बँक :

पेमेंट करण्यापासून ते फोटो काढण्यापर्यंत, मोबाईल फोन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आपण कुठेही जाताना मोबाईल घेऊन जातोच. तथापि, ते चार्ज होण्याची प्रतीक्षा करणे नेहमीच शक्य नसते. पॉवर बँक्स हे काम सोपे करतात कारण ते कुठेही घेऊन जाता येतात. परंतु कधीकधी वायर केबल कनेक्ट करणे कठीण असते. म्हणूनच तुम्ही तुमच्या मित्राला वायरलेस पॉवर बँक भेट देऊ शकता.

  • टेम्परेचर कंट्रोल ट्रॅव्हल मग :

जर तुमचा मित्र चहा किंवा कॉफीचा शौकीन असेल तर भेटवस्तू देण्यासाठी ही एक उत्तम गोष्ट आहे. टेम्परेचर कंट्रोल ट्रॅव्हल मगमुळे तुमच्या मित्राला नेहमी गरमागरम कॉफी किंवा चहा पिता येईल.

  • इन्स्टॅक्स मिनी कॅमेरा :

प्रत्येक चित्र आपल्या मोबाईलवर ठेवणे नेहमीच शक्य नसते. कधीकधी, काही तांत्रिक त्रुटींमुळे, आपण सर्वोत्तम आठवणी कॅप्चर करण्यात अक्षम असतो. तथापि, या इन्स्टॅक्स मिनी कॅमेरासह, आपण केवळ चित्र क्लिक करू शकत नाही तर आपल्याला फोटो क्लिक करताच हार्ड कॉपी देखील तात्काळ मिळू शकते.

  • डेकोरेटिव्ह लॅम्प्स :

ऑनलाइन भरपूर डेकोरेटिव्ह लॅम्प्स उपलब्ध आहेत. हे दिवे तुमची खोली सुंदर करतात. तुमच्या मित्राला शो-पीस खरेदी करण्याची सवय असेल, तर ही एक उत्तम भेट ठरू शकते.

Story img Loader