First Sunrise In India: जर निसर्गाच्या रूपात तुम्हाला भगवंताचे प्रेमपाहायचे असेल तर तुम्ही सूर्योदय पाहा असे म्हणतात. खरोखर, जेव्हा सूर्याची पहिली किरणे जेव्हा पृथ्वीला स्पर्श करतात तेव्हा हे दृश्य अत्यंत मोहक दिसते. प्रत्येकाला माहित आहे की पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत असते, त्यामुळे दिवस आणि रात्र तयार होतात. भारतातील पहिला सूर्योदय कुठे होतो हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित बहुतेक लोकांना माहित असेल की अरुणाचल प्रदेश हा भारतातील पहिला दिवस आहे. पण, इथे आम्ही अरुणाचल प्रदेशातील त्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे सूर्याची किरणे देशाच्या इतर भागांत पोहोचण्यापूर्वीच सर्वात आधी पोहोचतात.

देशात सूर्याचा पहिला किरण इथे पडतो

अरुणाचल प्रदेशातील त्या खास जागेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, जिथे सूर्याची किरणे सर्वात आधी पडतात. अरुणाचल प्रदेश राज्यात सूर्य प्रथम उगवतो. सूर्याची किरणे प्रथम या राज्याच्या भूमीवर पडतात. अरुणाचल प्रदेशातील हे अचूक ठिकाण, जिथे सूर्य पहिल्यांदा दिसतो ते म्हणजे डोंग व्हॅली. भारत, चीन आणि म्यानमारच्या त्रि-जंक्शनवर वसलेल्या अरुणाचल प्रदेशातील हे छोटेसे गाव ईशान्य सीमेवरील भारताचे पहिले गाव म्हणता येईल. भारतातील सूर्याची पहिली किरणे या गावाच्या जमिनीवर पडतात.

हेही वाचा – पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? ट्रेकिंग करताना काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात

पहाटे ४ वाजेपर्यंत येथे असतो भरपूर प्रकाश

नवीन वर्षात सूर्याची पहिली किरणे पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येथे येतात. दिल्लीत दुपारचे चार वाजले की, इथे रात्रीची वेळ असते. पहाटे ३ वाजल्यापासून येथे सूर्याची लाली दिसू लागते. इथली संध्याकाळ जवळपास सकाळसारखीच असते. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी डोंग गावाला भेट देऊ शकता. पण, भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान आहे. पहाटे ३ वाजता जेव्हा दिल्ली आणि मुंबईसह देशातील बहुतेक भाग गाढ झोपेत असतात, तेव्हा सूर्याची पहिली किरणे या डोंग गावात पडतात आणि पहाटे ४ वाजता ते गाव सुर्यकिरणांनी पूर्णपणे उजळून निघते.

हेही वाचा – Monsoon Travel Tips : पावसाळ्यात ‘या’ पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका: नाही तर सुट्टी पाण्यात गेली म्हणून समजा

दिवस १२ तासांचा आहे

डोंग गावात दिवसाचा प्रकाश १२ तासांचा असतो. देशाच्या इतर भागातील लोक संध्याकाळी 4 वाजता चहा तयार करतात तेव्हा या गावात रात्र असते. लोक रात्रीचे जेवण बनवण्यात आणि झोपण्याच्या तयारीत व्यस्त असतात. डोंग गाव नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. हे सुमारे १२४० मीटर उंचीवर वसलेले आहे आणि लोहित आणि सती नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या गावात भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, या गावाची लोकसंख्या जेमतेम ३५ आहे.

यापूर्वी अंदमानच्या कच्छल बेटाला हा दर्जा होता

१९९९ च्या आधी असे मानले जात होते की भारतातील सूर्याची पहिली किरणे अंदमानच्या कच्छल बेटावर पडायची. हे गाव १९९९ मध्ये प्रसिद्ध झाले आणि असे आढळून आले की, हे अंदमान नव्हे तर अरुणाचल प्रदेशातील डोंग गाव आहे, जिथे पहिला सूर्योदय होतो. हा खुलासा झाल्यानंतर या ठिकाणी पर्यटक, निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींची वर्दळ लक्षणीयरीत्या वाढली आहे.

Story img Loader