भारतात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीपी नियंत्रणात न ठेवल्यास इतरही अनेक आजार होऊ शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कमी रक्तदाब देखील उच्च रक्तदाबाप्रमाणे धोकादायक आहे. एखाद्या व्यक्तीला यापैकी कोणतीही समस्या असल्यास, सतत देखरेख आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
घरी रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत
डॉक्टरांच्या मते, उच्च किंवा कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमितपणे बीपीचे निरीक्षण केले पाहिजे. तुम्ही घरच्या घरीच बीपी तपासू शकता, पण यादरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. बीपी तपासण्यासाठी शांत जागा निवडा. हलके कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बीपी मशीनचा बेल्ट हातावर सहज बसू शकेल. तुमच्या पाठीवर सरळ बसा. पाय वाकलेले किंवा ओलांडलेले नसावेत. बीपी तपासताना बोलणे, टीव्ही पाहणे किंवा वर्तमानपत्र वाचणे टाळा.
( हे ही वाचा: Uric Acid: युरिक ऍसिड फक्त एका महिन्यात कमी होईल; ‘या’ ३ प्रकारच्या पानांचे सेवन करा, मिळेल आश्चर्यकारक फायदा)
उजवा की डावा रक्तदाब नेमक्या कोणत्या हाताने मोजायचा?
तज्ञांच्या मते, तुम्ही कोणत्याही हाताने रक्तदाब मोजू शकता, परंतु जर तुम्ही उजव्या हाताने सर्व काम करत असाल तर डाव्या हाताने बीपी मोजणे चांगले. काही वेळा उजव्या किंवा डाव्या दोन्ही हातांनी बीपी मोजताना वेगवेगळे रिडिंगही येऊ शकते. डॉक्टरांच्या मते, दोघांमध्ये १० पेक्षा कमी गुणांचा फरक असेल तर कोणतीही अडचण नाही. यापलीकडे कोणताही फरक घातक ठरू शकतो. या परिस्थितीत, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बीपीचे चुकीचे रिडींग कधी येते?
- धूम्रपान केल्यानंतर लगेच
- व्यायाम किंवा जिम केल्यानंतर
- तणावामुळे
- पोट भरले असेल तर
- तुम्ही कॅफिनचे सेवन केले असेल तर
- काही औषधे चुकीचे रिडींग देखील करू शकतात