Which Ghee is Better For Weight Loss: देशभरात हळूहळू थंडीची लाट पसरत आहे, थंडीच्या दिवसात त्वचेपासून शरीराच्या अंतर्गत अवयवांपर्यंत सगळ्याची काळजी घेणं गरजेचं असतं. या दिवसात मुख्यतः स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो याचं कारण म्हणजे थंडीत शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी तेल, तूप, लोणी असे पदार्थ मदत करतात. अनेकजण कॅलरीज वाढतील अशा भीतीने तुपाचे सेवन टाळतात मात्र आश्चर्याची बाब अशी की तुपातील ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त असते परिणामी तुमच्या वजन कमी करण्याच्या मोहिमेतही याची मदत होऊ शकते. तुपाचे एवढे फायदे आपण पाहिले पण नेमकं योग्य तूप निवडावं कसं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाजारात गाय व म्हैस अशा दोन्ही प्राण्यांच्या दुधाचे तूप उपलब्ध असते, गायीचं तूप पिवळसर तर म्हशीचं तूप पांढऱ्या रंगाचं असतं. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर यातील नेमकं कोणतं तूप अधिक फायदेशीर ठरू शकतं हे आज आपण पाहणार आहोत..

म्हशीच्या म्हणजे पांढऱ्या तुपाने वजन वाढते का?

पांढरे तूप म्हणजेच म्हशीच्या दुधापासून बनलेले तूप हे पोषक सातवांचा खजिना मानले जाते. या तुपात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस असे अनेक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीर सुदृढ व हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते. मात्र पांढरे तूप हे कॅलरीजमध्येही तितकेच पुढे असल्याने यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. रामदेव बाबा सांगतात की गायीच्या दुधामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची वाढ कमी होते त्यामुळे हृदयाशी संबंधित विकार टाळता येऊ शकतात.

गायीच्या म्हणजे पिवळ्या तुपाने वजन वाढते का?

पिवळ्या तुपात म्हणजेच गायीच्या तुपात अँटी बॅक्टेरियल, अँटी- फंगल, आणि अँटी ऑक्सिडंट गुणसत्व असतात ज्यामुळे शरीराला लाभ होऊ शकतो. या तुपात A2 प्रोटीन व कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते, गायीच्या तुपामुळे शरीरात कॅलरीज वाढण्याऐवजी कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते परिणामी आवश्यक फॅट्स शरीराला नियमित प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करू शकतात.

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ, रुजुता दिवेकर यांनीही तुपाशी संबंधित अनेक गैरसमजांवर भाष्य केले आहे. सर्वात चुकीचा समज असा की तुपात फॅट्स असतात त्यामुळे वजन वाढते. रुजुता म्हणतात की तूप हे शरीरातील फॅट्सची साखळी मोडण्यासाठी कामी येतात यामुळे वजन वाढत नाही तर उलट नियंत्रित राहण्यास मदत होते.

उंचीनुसार तुमचे वजन परफेक्ट आहे का? इंच व किलोचं बेस्ट समीकरण जाणून घ्या, पाहा तक्ता

सेक्समुळे स्तनांचा आकार वाढतो का? ‘या’ ७ कारणांनी अचानक वाढू शकते Breast Size

तज्ज्ञांच्या माहितीनुसार दिवसाच्या सुरुवातेला कोमट पाण्यात एक चमचा तूप घालून प्यायलास काहीच दिवसात अपचन व बद्धकोष्ठ सारख्या समस्यांवर आराम मिळू शकतो. तुपामुळे शरीरातील सांध्यांचे लवचिकता वाढण्यासही मदत होते परिणामी सांधे दुखीच्या वेदना कमी होण्यासही तुपाचा फायदा होऊ शकतो.