बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. निरोगी राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरी त्यात यश मिळत नाही. सतत कोणतातरी अवयव दुखत असल्याची तक्रार अनेकजण करतात. त्यातीलच एक म्हणजे पायांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना. अनेकजण या समस्येने त्रस्त असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील जाणून घ्या.
पायांचे स्नायू दुखण्याचे कारण
‘विटॅमिन डी’ची कमतरता, थायरॉइड, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे या कारणांमुळे पायांचे स्नायू दुखू शकतात.
हे उपाय ठरतील फायदेशीर :
बर्फाने शेका :
जर तुम्हाला पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना होत असतील तर त्यावर बर्फानी शेका, १५ ते २० मिनिटे बर्फाने शेकल्याने या वेदना कमी होतील.
आले
आहारात आल्याचा समावेश करा. आल्यामध्ये अँटिइनफ्लामेंटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळते.
आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!
मोहरीच्या तेलाने मसाज करा
मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास पायांच्या स्नायूमधील वेदना कमी होण्यास मदत मिळते. मसाज केल्याने स्नायू मजबुत होण्यास मदत मिळते.
व्यायाम करा
व्यायाम केल्याने जमा पायांमध्ये जमा झालेले फ्लूएड पसरते आणि पायांवरची सूज कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे पायांच्या स्नायूमधील वेदना कमी होतात. झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपल्याने देखील स्नायूंच्या वेदनांपासून सुटका मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)