best massage oil for baby in Summer: जन्मानंतर बाळ खूप संवेदनशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचे शरीर देखील नाजूक असते आणि ते मजबूत करण्यासाठी बाळाची मालिश करणे गरजेचे असते. नवजात बाळाच्या व लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी मसाज हा एक पारंपारिक आणि प्रभावी मार्ग आहे. मालिशमुळे बाळाला आराम मिळतो, हाडे मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. बाळाला जेव्हा मालिश केली जाते तेव्हा त्या शरीरासाठी तेलाचा वापर केला जातो. आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या तेलाने बाळाची मालिश करणे फायदेशीर असते, त्याविषयी जाणून घेऊया…

बाळाला मालिश करण्याचे फायदे

बाळाला मालिश करण्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्या शरीराला आकार मिळतो आणि त्याचे अवयव सक्षम होत जातात. बाळाला देखील मालिश घेतल्यावर खूप छान वाटतं. बाळाचे दिवसातून तीन ते चार वेळा मालिश केल्याने हाडे आणि स्नायूंचा योग्य विकास होण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण देखील सुधारते. मसाजमुळे बाळाच्या स्नायूंचा टोन सुधारतो आणि कडकपणा कमी होतो. बाळाच्या झोपेचे चक्र नियंत्रित होते.बाळाला पूर्ण अंगाला मालिश केल्याने आणि मसाजदरम्यान बाळाचे स्ट्रेचिंग करून घेतल्याने बाळाला पोटाचे त्रास कमी होतात.

नवजात बाळाला मालिश करण्यासाठी कोणते तेल योग्य?

बाळाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे कुठलेही सुगंधी तेल बाळाच्या त्वचेवर लावू नये.  नवजात बाळाला मालिश करण्यासाठी तेल निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. बरेच लोक लहान मुलांना मोहरीच्या तेलाने मालिश करतात. हे तेल नवजात बाळासाठी खूप चांगले आहे. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात हे तेल लावणे टाळावे. तेल उष्ण असल्याने. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात हे तेल लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

‘या’ तेलाने करा मालिश

उन्हाळ्यात बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करणे खूप चांगले असते. या तेलाने मालिश केल्याने उन्हाळ्यात बाळाच्या शरीरावर येणारा कोरडेपणा आणि पुरळ कमी होतात. त्यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे नाजूक आणि संवेदनशील त्वचेसाठी खूप चांगले असतात. हे लावल्याने मुलांना दिवसभर ताजेतवाने वाटते.

मुलांना नारळाचे तेल लावण्याचे फायदे

  • नारळाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. हे लावल्याने त्वचा मऊ आणि कोमल राहते.
  • नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यात संसर्गापासून त्यांचे संरक्षण करतात.
  • मोहरीचे तेल त्वचेवर चिकट होते. त्याच वेळी, नारळाचे तेल त्वचेत खूप लवकर शोषले जाते. हे लावल्याने मुलाला अस्वस्थ वाटत नाही.
  • उन्हाळ्यात लहान मुलांना मालिश करण्यासाठी नारळाचे तेल खूप चांगले आहे. या तेलाने हलक्या हाताने मालिश केल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि बाळाला चांगली झोप येते.