बदलत्या जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त दुर्लक्ष आहाराकडे होते. कामाचा ताण, रोजच्या डेडलाईन्स यामध्ये अनेकांना वेळेवर जेवता येत नाही. याचा परिणाम आरोग्यावर झालेला दिसून येतो. वेळेवर न जेवल्यास वजन वाढणे, सतत अपचन होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याउलट वेळेवर जेवल्याने निरोगी राहण्यास मदत मिळते. दिवसभरात कोणत्या वेळी जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते जाणून घ्या.
नाश्ता
सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण यामुळे दिवसभरातील काम करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते. नाश्त्यामध्ये अंडी, दूध, शेंगदाणे अशा प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करू शकता. सकाळी ६ ते ९:३० या वेळेत नाश्ता करावा.
दुपारचे जेवण :
डेडलाईनच्या टेन्शनमध्ये बऱ्याचवेळा दुपारचे जेवण करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे एक तर दुपारी जेवण करणे टाळले जाते किंवा दुपार संपल्यानंतर संध्याकाळी जेवण केले जाते. पण यामुळे अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे दुपारचे जेवण १ वाजेपर्यंत करावे.
आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!
रात्रीचे जेवण :
रात्री आपण जे अन्नपदार्थ खातो त्याचा आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. कारण रात्री शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात जास्त कॅलरी असणारे अन्नपदार्थ खाणे टाळावे. याएवजी पालेभाज्या, प्रोटीनचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. रात्रीचे जेवण इतक्या लवकर करता येऊ शकेल तितक्या लवकर करावे. जेवल्यानंतर लगेच झोपू नये त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)