Cleaning Wooden Door: लाकडाचे दरवाजे कालांतराने खराब होतात आणि त्यामुळे त्याच्या रंगावरही परिणाम होऊन, त्याची चमकही कमी होते. अशा परिस्थितीत हे दरवाजे स्वच्छ करण्याबरोबरच त्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी उपाय करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण दरवाजांच्या साफसफाईशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाकडी दरवाजे स्वच्छ वापरा हे तेल

लाकडी दरवाजे स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल उत्तम आहे. या तेलाची खास गोष्ट म्हणजे हे तेल थोडे जड असते. त्यामुळे हे तेल दरवाजाची चमक टिकवून ठेवण्यासही मदत करते. तसेच त्याची खास गोष्ट म्हणजे नारळाचे तेल जीवाणूविरोधी आहे. त्यामुळे दरवाजात कीटक प्रवेश करू शकत नाहीत आणि दरवाजाची चमकही टिकून राहते.

जुने दरवाजे साफ कसे करावेत?

लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल

लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल दोन्ही मिसळून दारावर लावा. त्यामुळे दारावरील चमक टिकून राहते आणि दारातून आवाजही येत नाही. तसेच लिंबाच्या रसामुळे लाकडाला किडे लागत नाही. त्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल घेऊन, त्यात लिंबाचा रस टाका आणि ते मिश्रण दरवाजावर लावा.

मोहरीचे तेल व्हिनेगरमध्ये मिसळून लावा

यासाठी मोहरीच्या तेलात व्हिनेगर मिसळून ते दारावर लावा. त्यासाठी कापसाचा वापर करा. त्यामुळे लाकडी दरवाजांवर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि दरवाजांची चमकही कायम राहील. त्यामुळे फक्त या टिप्स फॉलो केल्यामुळे लाकडी दरवाजे नेहमी चमकत राहतील. मात्र, हा उपाय तुम्हाला दर १०-१२ दिवसांनी करावा लागेल; जेणेकरून लाकडी दरवाजे नेहमी चमकदार राहतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which oil should be used to clean wooden doors will continue to shine for years sap