Chandra Grahan 2022 In India: २५ ऑक्टोबरला झालेल्या सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार असून तो लाल रंगाचा दिसणार आहे. यालाच इंग्रजीमध्ये ‘ब्लड मून’ असेही म्हणतात. जवळपास तीन वर्षांनंतर हे सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. २०२२ वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण भारतात कुठे आणि किती वाजता पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रशियामधील काही भाग, तसेच आशिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अटलांटिक महासागर, प्रशांत महासागराच्या काही भागात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. ८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.
पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या क्षेत्रातून जातो तेव्हा काही काळासाठी पूर्ण चंद्रग्रहण होते. संपूर्ण चंद्रग्रहणात, चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीच्या सर्वात गडद भागात येतो. जेव्हा चंद्र सावलीत असतो तेव्हा तो कधीकधी लाल होतो. या घटनेमुळे, चंद्रग्रहणाला ‘ब्लड मून’ असेही म्हटले जाते.
हेही पाहा : Photos : ८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण वाढवणार ‘या’ राशींची चिंता; अशुभ योगामुळे होऊ शकते आर्थिक नुकसान
८ नोव्हेंबरला भारतात होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाचे टप्पे
- आंशिक चंद्रग्रहण दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी सुरु होईल.
- संपूर्ण चंद्रग्रहण दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल.
- कमाल पूर्ण चंद्रग्रहण दुपारी ४ वाजून २९ मिनिटांनी होईल. तर संध्याकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी हे पूर्ण चंद्रग्रहण संपेल.
- सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रास्त होईल.
८ नोव्हेंबरला होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण भारताच्या काहीच भागांमध्ये दिसणार असले तरीही अधिकांश भागात आंशिक चंद्रग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नाही. तथापि, दुर्बिणीच्या माध्यमातून आपण चंद्राचा लाल रंग स्पष्टपणे पाहू शकतो.
भारतात पूर्ण चंद्रग्रहण कुठे पाहता येणार?
कोलकात्यासह पूर्व भारतातील काही भागातील लोक संपूर्ण चंद्रग्रहण पाहू शकतील, तर उर्वरित भागातील लोक आणशिक चंद्रग्रहण पाहण्यास सक्षम असतील. देशाच्या पूर्व भागात कोहिमा, आगरतळा, गुवाहाटी या शहरांच्या स्थितीमुळे येथील लोक कोलकात्याच्या आधीच संपूर्ण चंद्रग्रहण पाहू शकतात. नवी दिल्ली येथे सुमारे ५ वाजून ३१ मिनिटांनी आंशिक चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावेळी चंद्राचा ६६% भाग अस्पष्ट असेल. तर बेंगळुरूमध्ये ५ वाजून ५७ मिनिटांनी पूर्ण चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राचा २३% भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असेल.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाहता येणार पूर्ण चंद्रग्रहण?
महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुमारे ६ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास १४% अपारदर्शकतेसह चंद्रग्रहण पाहता येणार आहे.