शरीरासाठी सकस आहार फार गरजेचा आहे. आहारातून आवश्यक तेवढे जीवनसत्वे, प्रथिने आपल्याला मिळायला हवेत. योग्य प्रमाणात शरीराला आवश्यक ते पदार्थ मिळाल्यास आरोग्य चांगले राहाते आणि शरीर देखील सुदृढ राहाते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि ताकदीसाठी डाळींचे सेवन फायदेशीर ठरते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन असते.
प्रोटीनसाठी मुग डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मुग डाळ सर्वांसाठी फायदेशीर आहे असे नाही. काही लोकांना ती नुकसान देखील पोहचवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही परिस्थितींमध्ये ही डाळ खाण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञ मानतात.
या स्थितीत मुग डाळ खाऊ नये
१) लो ब्लड प्रेशर
हाय ब्लड प्रेशर असल्यास कदाचित डॉक्टर तुम्हाला मुग डाळ खाण्याचा सल्ला देतील. मात्र लो ब्लड प्रेशरमध्ये परिस्थिती विरुद्ध असते. लो ब्लड प्रेशरमध्ये मुग डाळ खाऊ नये, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.
२) पोट फुगणे (Bloating)
कुण्या कारणास्तव पोट फुगण्याची समस्या झाल्यास मुग डाळीचे सेवन टाळावे, कारण मुग डाळीत शॉर्ट चेन कार्ब्स आढळतात, ज्यांच्यामुळे पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
३) लो ब्लड शुगर
ज्या लोकांच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी होते त्यांची अनेकदा अशक्तपणा किंवा चक्कर येण्याची तक्रार असते. रक्तात साखरेचे प्रमाण कमी असल्यास मुग डाळ खाऊ नये, कारण याणे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून कमी होईल आणि तुम्हाला चक्कर येईल.
४) यूरिक अॅसिड
यूरिक अॅसिडचा त्रास असलेल्यांनी मुग डाळीचे सेवन टाळावे. कारण मुग डाळ शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढवू शकते आणि त्यामुळे सांधेदुखी होईल. त्यामुळे, मुग डाळीच्या सेवनाबाबत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.