सतत येणाऱ्या पिंपल्समुळे अनेकजण त्रस्त असतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते, तसेच यामुळे चेहऱ्यावर डाग राहून त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे जर तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील तर त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी काहीजण वेगवेगळे प्रोडक्ट्स, महागड्या ट्रीटमेंट असे सर्व उपाय करतात पण त्यानेही फारसा फरक जाणवत नाही. काही खाद्यपदार्थांमुळेही पिंपल्स येऊ शकतात. कोणते आहेत असे खाद्यपदार्थ जाणून घ्या.
सतत पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरणारे खाद्यपदार्थ
आणखी वाचा: Kitchen Tips: स्वयंपाकघरातील करपलेली भांडी लगेच होतील स्वच्छ; फक्त वापरा या सोप्या टिप्स
दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. तज्ञांच्या मते चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा रिंकल्सपासून पूर्णपणे सुटका मिळत नाही तोपर्यंत दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. दूध, ताक यांचे सेवन करणे टाळावे, तर दही, पनीर अशा पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असणारे पदार्थ
ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असणारे पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. साखर, चॉकलेट, फळांचा रस, अति थंड पेयं, पांढरे ब्रेड, फास्ट फूड, बटाटा या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो. स्किन स्पेशलिस्ट आणि ट्राइकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाबत माहिती दिली. ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे, असे पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा: सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर
असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील ग्लायसेमिक पातळीत वाढ होते, ज्यामुळे इन्सुलिन निर्मितीवरही परिणाम होतो. या पदार्थांच्या सेवनाने ऑइल ग्लॅंड सक्रिय होते आणि त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.यापासून वाचण्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.