लोकशाहीत मतदान हा सर्वांचा मुलभूत अधिकारी आहे. एका मतानं एखादा उमेदवार पडतो किंवा जिंकतो. त्यामुळे प्रत्येक मत मौल्यवान आहे. तुम्ही मतदान केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की, मत देण्यापूर्वी बोटाला शाई लावली जाते. त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला जातो. मतदान कक्षातून बाहेर येईपर्यंत शाई सुकून जाते. यामुळे मतदान केलं की नाही याबाबत कळतं. तसेच बोगस मतदान टाळलं जातं. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, जर एखाद्या मतदाराला बोटंच नसतील तर शाई कुठे लावत असतील? माहिती नसेल तर या बातमीमुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल.
निवडणुकीला जे लोकं मतदान करतात त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाची नियमावली आहे. मत देणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. ब्रशने नखाच्या वर पहिल्या गाठीपर्यंत शाई ओढली जाते. कारण संबंधित व्यक्तीने मत दिलं आहे, याबाबत माहिती मिळते. यामुळे बोगस मतदानाला आळा घातला जातो. एखाद्या व्यक्तीने शाई पुसण्याचा प्रयत्न केला तरी ती पुसली जात नाही. शाई कित्येक दिवस निघत नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताची तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या इतर बोटांपैकी एका बोटाला शाई लावली जाते. यात उजव्या हाताला बोटंच नसतील तर डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते.
वोटिंग आयडी कार्ड नसेल तरी चिंता करू नका! असं करू शकता मतदान
मात्र दोन्ही हातांमध्ये बोटं नसल्यास दोन्ही हातांच्या कोणत्याही भागावर निवडणुकीची शाई लावता येते. त्याच वेळी, व्यक्तीला दोन्ही हात नसल्यास, पायाच्या बोटावर निवडणुकीची शाई लावली जाते.