सध्याच्या काळात जसे अनेकजण वाढलेले वजन आणि पोटावरील चरबीमुळे लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे वजन आणि चरबी कमी करण्यासाठी अनेक टिप्स आहारात समावेश करतात. त्याचप्रमाणे काही लोकं पातळपणाच्या समस्येशी झगडत आहेत. काही लोकं जास्त पातळ असतात, ज्यामुळे त्यांना काही वेळा अस्वस्थपणाला सामोरे जावे लागते. त्यांच्या पातळपणामुळे लोकं त्याची खिल्ली उडवतात आणि त्यांना वेगवेगळ्या नावांनी सुद्धा हाक मारतात. वजन वाढत नसल्याच्या समस्येमुळे काही लोकांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. वजन वाढवण्यासाठी लोकं विविध पूरक आणि औषधे घेत असतात. परंतु वजन वाढविणारी औषधे शरीरासाठी हानिकारक ठरतात.
अशा स्थितीत आरोग्य तज्ञ दुबळेपणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना नियमित व्यायाम आणि आहारात बदल करण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते अशा काही गोष्टी आहेत. ज्या तुम्ही जर तुमच्या आहारात समाविष्ट केल्या तर वजन वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाही.
दूध आणि मध
आरोग्य तज्ञ सुचवतात की जे लोकं जास्त पातळ आहेत, त्यांनी अशा नाश्त्याचे सेवन करावे, ज्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे वजन वाढवण्यासाठी नाश्त्यामध्ये दूध आणि मध यांचा समावेश करू शकता. दुधात असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते, मध पचन प्रणाली सुधारते. तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुधासह मध घेऊ शकता.
तूप आणि साखर
जर तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आहारात तूप आणि साखर देखील समाविष्ट करू शकता. तुपामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, तर साखरेमध्ये अनेक पटीने जास्त कॅलरीज असतात. अशा स्थितीत तुम्ही दुपारच्या जेवणात तुपात साखर मिसळून सेवन करू शकता. यासाठी जेवण करण्यापूर्वी चवीनुसार एक चमचा तूप घेऊन त्यात साखर मिसळून खा. त्यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नाश्ता आणि रात्रीच्या जेवणापूर्वी देखील हा उपाय अवलंबू शकता.
बीन्स
बीन्स, राजमा, मसूर आणि सोयाबीनमध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, शेंगांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज व्यतिरिक्त, फायबरचे प्रमाण देखील पुरेसे असते. हे तुमच्या वजन वाढीस मदत करतात.
(टीप: वरील महितीचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. किंवा क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)