बहुतेकजण वजनवाढीच्या भीतीने पांढरा पाव खाणे टाळतात. पांढ-या पावात आवश्यक अशी जीवनसत्वे असतात. ती आरोग्यासाठी हितकारक असतात. पावामुळे वजन वाढते हा समज चुकीचा असल्याची दावा संशोधकांनी केला आहे.
पांढ-या पावात अनेक पोषक द्रव्ये असतात. पावाबाबत आरोग्यविषयक मोहिमा आणि आहारतज्ज्ञाकडून करण्यात येत असणा-या टीकांमध्ये काही तथ्य नसल्याचा दावा आहार संशोधक डॉ. अॅनी ओकॉनर यांनी केला आहे. ब्रिटिश न्यूट्रिशन फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पांढ-या पावावर संशोधन करण्यात आले. त्याच आधारे डॉ. ओकॉनर यांनी हा दावा केला आहे.
पांढ-या पावामुळे पोटाचा घेर वाढतो, वजन वाढते आणि अॅलर्जीची संख्या वाढते हे सर्व समज या संशोधनाद्वारे फोल ठरवण्यात आले आहेत. पावात अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्यामुळे पावाबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे ओकॉनर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा