पांढऱ्या केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याला सामोरे जाण्यासाठी बहुतेक लोक सर्व प्रकारच्या टिप्सचा अवलंब करतात. काही लोक महागडी उत्पादने वापरतात तर काही लोक केसांना कलर करून घेतात. अशा परिस्थितीत काही लोक केस तोडण्यास सुरुवात करतात. वास्तविक, जेव्हा काही लोकांचे एक किंवा दोन केस पांढरे होऊ लागतात तेव्हा ते डोक्याचे केस तोडू लागतात. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल, तर तुम्ही तुमची समस्या संपवण्याऐवजी वाढवत आहात. पांढरे केस तोडल्याने काय परिणाम होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
पांढरे केस तोडण्याचे तोटे
जर तुम्ही पांढरे केस तोंडत असाल तर तसे करणे बंद करा, कारण असे केल्याने तुम्ही इतर समस्यांना आमंत्रण देत आहेत. पांढरे केस उपटून तुमच्या केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो आणि काढलेल्या पांढऱ्या केसाच्या जागी नवीन केसांचे उगवणे बंद होऊ शकते. याशिवाय केसांची घनता कमी होऊन केस पातळ होतात. म्हणजेच, त्यामुळे केस उपटून काढणे हा योग्य उपाय नाही, ज्यामुळे केसांमध्ये जागोजागी टक्कल पडणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आणखी वाचा : “तू भारतीय नाहीस, कॅनेडियन आहेस”; अक्षय कुमारला केआरकेने लगावला टोला
या गोष्टींमुळे पांढरे केस काळे होऊ शकतात
- आवळा आणि मेथी दाणे
- काळा चहा
- बदामाचे तेल आणि लिंबाचा रस
- मेहंदी आणि कॉफी
- कढीपत्ता आणि तेल
- जवस तेल
या कारणांमुळे केस पांढरे होतात
- वाईट जीवनशैली
- पाणी बदलणे
- ताण
- केसांवर प्रयोग करणे
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)