Brown or white egg: अंडी केवळ चविष्टच नाही तर शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांनीही समृद्ध असतात, त्यामुळेच अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे, असे लोक प्रथिने मिळवण्यासाठी अंडी खाणं पसंत करतात. प्रथिने अन्नाची तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत करतात, शिवाय ते चयापचयदेखील वाढवतात, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

परंतु, बाजारात दोन प्रकारची अंडी उपलब्ध असतात. यापैकी एक पांढऱ्या रंगाचे अंडे आणि दुसरे तपकिरी रंगाचे अंडे असते. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की कोणत्या अंड्यामध्ये जास्त प्रथिने असतात पांढरे की तपकिरी किंवा वजन कमी करण्यासाठी कोणते अंड खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते? जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

त्याआधी तपकिरी आणि पांढऱ्या अंड्यांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊ

खरं तर पांढरी अंडी अशा कोंबड्या देतात, ज्यांची त्वचा आणि कान पांढरे असतात, तर तपकिरी अंडी तपकिरी किंवा लाल रंगाच्या कोंबड्या देतात.

तपकिरी अंड्यांमध्ये जास्त पोषक तत्वे असतात का?

तपकिरी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा जास्त महाग असतात, त्यामुळे अनेकांचा असा विश्वास आहे की तपकिरी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा आरोग्यदायी असतात आणि त्यात जास्त पोषक घटक असतात, परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. तपकिरी अंडी जास्त किमतीत उपलब्ध असतात, कारण ती देणाऱ्या कोंबड्या जास्त फीड खातात.

याशिवाय दोन्ही अंड्यांच्या पोषणमध्ये कमी फरक आहे. पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांमध्ये समान प्रमाणात प्रथिने असतात. सामान्य आकाराच्या तपकिरी अंड्यामध्ये ६-७ ग्रॅम प्रथिने असतात, त्याचप्रमाणे सामान्य आकाराच्या पांढऱ्या अंड्यामध्येही ६-७ ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय, दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये सुमारे ७० कॅलरीज आणि ५ ग्रॅम फॅट असते. तपकिरी अंड्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण थोडे जास्त असू शकते, परंतु हा फरक थोडासा असतो.

वजन कमी करण्यासाठी कोणते अंडे खावे?

दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये प्रथिने, कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण जवळजवळ सारखे असल्याने वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणतेही अंडे, पांढरे किंवा तपकिरी रंगाचे खाऊ शकता.

निरोगी पद्धतीने अंडी कशी खावीत?

फक्त अंड्याचा पांढरा भाग खा – जर तुम्हाला कमी कॅलरीज घ्यायच्या असतील तर फक्त अंड्याचा पांढरा भाग खा.

उकडलेले अंडे हा सर्वोत्तम पर्याय आहे – तळलेले किंवा खूप मसालेदार अंडे टाळा आणि उकडलेले अंडे खा.

तुमच्या नाश्त्यात अंडी नक्की समाविष्ट करा – ते चयापचय वाढवते आणि तुम्हाला बराच काळ पोट भरलेले ठेवते.

अंडी भाज्यांबरोबर एकत्र करा – असे केल्याने पोषण वाढते आणि तुम्हाला फायबरदेखील मिळते.

Story img Loader