Mouth Ulcer Ayurvedic Treatment: बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकदा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं यातूनच अपचनाचा त्रास सुरु होतो. अपचन म्हणजे एकाला जोडून आलेल्या अनेक आजारांचं जाळंच म्हणता येईल, अपचनातूनच बद्धकोष्ठ, वात, पित्ताचा त्रास उद्भवतो. महिलांमध्ये मासिक पाळीच्या अनियमितत्यामागेही अपचन कारण असू शकते, पचनप्रक्रिया सुरळीत न झाल्यास वजन वाढण्याचा व त्यासह कोलेस्ट्रॉल, रक्तदाब असेही अनेक त्रास बळवण्याचा धोका असतो. अनेकांना अपचनामुळे माऊथ अल्सरचा त्रास होतो. तोंडाच्या अल्सरमध्ये जबड्यात पांढरे व लाल ठिपके दिसू लागतात. विशेषतः ओठाच्या आतील बाजूस पुरळ आल्यासारखे छोटे छोटे फोड येऊ लागतात.

तोंडातील अल्सरवर उपचार म्हणून बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत पण काही साध्या सोप्या घरगुती उपायांसह आपण कोणताही साईड इफेक्ट सहन न करता आराम मिळवू शकता.

Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO

माऊथ अल्सरवर घरगुती उपाय

मध

मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असता. तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी मध लावल्याने त्वरित आराम मिळू शकतो.

खोबरेल तेल किंवा साजूक तूप

नारळ तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे अल्सरच्या जंतूंचा नाश करण्याचे काम करतात. साजूक तूपही या अल्सरवर आराम देण्यासाठी उपयुक्त ठरते. नारळातील सत्व केवळ तेलच नव्हे तर अन्य रूपातही फायदेशीर ठरू शकतात. अल्सरवर उपाय म्हणून आपण नारळाचे दूध सेवन करण्याचा पर्याय विचारात घेऊ शकता.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून गुळण्या कराव्यात. मीठ हे एक उत्तम जंतुनाशक आहे, तोंडाची स्वच्छता ठेवण्यासाठी मिठाचा अवतार पूर्वीपासूनच केला जातो. दात घासण्यासाठीही मीठ हे फायदेशीर ठरू शकते.

तुळशीची पाने

तुळशीची पाने तोंडाच्या अल्सरच्या बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून थांबवतात. तुळशीची पाने चावून दिवसातून दोनदा कोमट पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाच्या अल्सरवर आराम मिळू शकतो.

लवंग तेल

दातदुखी आणि तोंडातील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी लवंग तेल उपयुक्त ठरते. तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी लवंग तेल लावल्यास आराम मिळू शकतो.

Uric Acid: युरिक ऍसिडचे शत्रू, शरीराचे मित्र! ‘ही’ ३ धान्य अपचन व गॅसवरही ठरतात रामबाण उपाय

तोंडाच्या अल्सरचा त्रास होत असल्यास चुकूनही ती फोड दाताने चावून फोडण्याचा प्रयत्न करू नका. अनेकदा ओठाच्या आत ही फोड येत असल्याने काहीतरी टोचतंय असं वाटतं अशावेळी अनेकजण दात किंवा जीभ लावून ती फोड फोडण्याचा प्रयत्न करतात पण यामुळे हा अल्सर आणखी पसरू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)