White Spot On Nails: शरीरात लपलेले काही गंभीर आजार बाहेर दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखले जाऊ शकतात. तुम्ही अनेकदा तुमच्या नखांवर पांढरे डाग पाहिले असतील. मात्र, काही लोकं या डागांकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या मते, नखांवर दिसणारे हे पांढरे डाग अनेक कारणांमुळे असू शकतात. परंतु यापैकी बहुतेक समस्या ल्युकोनीशियाशी संबंधित आहेत. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये नखांच्या प्लेटला गंभीर नुकसान होते. नखांवरचे हे पांढरे डाग शरीराबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया…
ल्युकोनीशिया
डॉक्टरांचे म्हणणे आहे की अनेकदा लोकांना ल्युकोनीशियामुळे नखांवर पांढरे डाग पडण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. यामध्ये तुमच्या हाताच्या एकापेक्षा जास्त नखांवर हे पांढरे डाग दिसू शकतात.
( हे ही वाचा: तुमच्या ‘या’ १० सवयी वेळीच बदला; नाहीतर कधीही होऊ शकते किडनी खराब)
बुरशीजन्य संसर्ग
अनेकदा बुरशीजन्य संसर्ग देखील नखांवर पांढरे डाग पडण्याच्या समस्येचे कारण बनतात. यामध्ये ओनिकोमाइकोसिस नावाच्या बुरशीमुळे नखांवर पांढरे डाग पडतात. या संसर्गामुळे तुमच्या बोटांनाही नुकसान होऊ शकते.
अनुवांशिक
काही वेळा अनुवांशिक कारणांमुळेही नखांवर पांढरे डाग पडण्याची समस्या उद्भवू शकते. डॉक्टर ल्युकोनीशियाची समस्या अनुवांशिक मानतात. जर एखाद्या व्यक्तीला या समस्येचा त्रास असेल तर त्याच्या पुढच्या पिढीतही तो त्रास होण्याची शक्यता वाढते.
( हे ही वाचा: सकाळी उठून फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; Blood Sugar Level राहील नियंत्रणात)
मिनरल्सची कमतरता
पोषणतज्ञ म्हणतात की शरीरात खनिजांच्या कमतरतेमुळे कधीकधी नखांवर पांढरे डाग दिसू शकतात. जेव्हा शरीरात झिंकची कमतरता असते तेव्हा ही समस्या अनेकदा दिसून येते. म्हणूनच शरीरात अशा खनिजांची कमतरता कधीही भासू देऊ नका.