What Is The differences between Whiteheads & Blackheads: आपला चेहरा चांगला दिसावा अशी इच्छा प्रत्येकालाच असते. त्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहत असतो. तर या सगळ्यात जर तुम्ही स्किनकेअरचा विचार केला, तर प्रत्येकाला दोन सामान्य समस्यांना तोंड द्यावे लागते. पहिलं म्हणजे १. व्हाईटहेड्स व २. ब्लॅकहेड्स. तर हे दोन्ही मुरुमांचे प्रकार आहेत. पण, दोघांचीही वैशिष्ट्ये भिन्न आहेत आणि दोघांचे उपचारही वेगवेगळे आहेत. तर (Whiteheads vs Blackheads) या दोघांमधील फरक आणि घरच्या घरी त्याचा उपचार कसा करायचा, हे समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्हाईटहेड्स म्हणजे काय ?

व्हाईटहेड्स हे लहान, पांढरे किंवा मांसाच्या रंगासारखे दिसतात; जे त्वचेच्या मृत पेशी, तेल, बॅक्टेरिया त्वेचेवरील केसांच्या कूपमध्ये अडकतात तेव्हा तयार होतात, त्यामुळे व्हाईटहेड्स पांढरे किंवा किंचित पिवळे दिसतात.

व्हाईटहेड्सची वैशिष्ट्ये :

व्हाईटहेड्सची छिद्रे बंद असतात. ते दिसायला पांढरा किंवा मांस-रंगाचे असतात, त्यांचा आकार लहान, गोल बंप्ससारखा असतो. हे अनेकदा चेहऱ्यावर, विशेषतः नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसून येतात.

ब्लॅकहेड्स म्हणजे काय ?

चेहऱ्याच्या त्वचेवर घाण जमा झाली की ब्लॅकहेड्स दिसू लागतात. नाक हाताला खरखरीत जाणवते, त्यावर काळ्या रंगाचे बारीक-बारीक ठिपके पाहायला मिळतात.

ब्लॅकहेड्सची वैशिष्ट्ये :

ब्लॅकहेड्सची छिद्रे ओपन असतात, त्यांचा रंग काळा असतो आणि हे नाक, हनुवटी आणि कपाळावर आढळतात.

हेही वाचा…Unwanted Food Cravings: क्रेव्हिंगवर कंट्रोल होत नाही? आहारतज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ उपाय लक्षात ठेवा; डाएट करताना होईल उपयोग

तर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स ( Whiteheads vs Blackheads) कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे :

टी ट्री ऑइल : टी ट्री ऑइलमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध घालणारा गुणधर्म असतो; ज्यामुळे जळजळ कमी होण्यास, मुरुम येणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. नारळ किंवा जोजोबा तेलसारख्या तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स (Whiteheads vs Blackheads) असतील तिथे लावा.

बेकिंग सोडा : बेकिंग सोडा एक्सफोलिएंट म्हणून कार्य करते, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि छिद्रे बंद करण्यास मदत करते. एक चमचा बेकिंग सोडा थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, नंतर गोलाकार हालचालीत त्वचेवर हळूवारपणे मसाज करा. उबदार पाण्याने स्वच्छ धुवा.

मध : मधामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ व दाहक-विरोधी गुणधर्म असतात; जे त्वचेला फ्रेश ठेवतात आणि ब्रेकआउट कमी करण्यास मदत करतात. तर हा मध थेट ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स (Whiteheads vs Blackheads) असणाऱ्या ठिकाणी लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

लिंबाचा रस : लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. तर कापसाच्या मदतीने तुम्ही ताज्या लिंबाचा रस त्वेचवर लावा, १० मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. नंतर सनस्क्रीन लावा, कारण लिंबाचा रस तुमची त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील ठरू शकते.

एलोवेरा : एलोवेरामध्ये त्वचेवर उपचार करण्याचे गुणधर्म आहेत; हे जळजळ, चेहऱ्यावर येणारी खाज कमी करून त्वचेला थंडावा देण्यास मदत करू शकतात. तर त्वचेवर ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात, तेथे एलोवेरा जेल लावा आणि सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून घ्या…

व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्समधील (Whiteheads vs Blackheads) फरक समजून घेणे ही उपचाराची पहिली पायरी आहे. हे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकत असले, तरी तुमच्या त्वचेला कोणती गोष्ट योग्य ठरेल यासाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. तसेच ज्यांना त्वचेच्या काही समस्या नसतील त्यांनी योग्य काळजी आणि योग्य उपचारांसह, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स घालवून स्वच्छ, निरोगी त्वचा राखली पाहिजे.