मद्यपान करण्याची सवय असणाऱ्यांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. कधी ट्रेंड म्हणून तर कधी ताण घालविण्यासाठी, कधी आपले स्टेटस जपण्यासाठी मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्येही मद्यपान करणे हे सामान्य झाले आहे. ‘द अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’ या संस्थेने हे संशोधन केले आहे.

ज्या महिला थोड्या प्रमाणात मद्यपान करतात त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. मद्यपानामुळे शरीरात कर्करोगाचे विषाणू जास्त प्रमाणात कार्यरत होतात आणि या स्त्रियांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. याबरोबरच जे नियमितपणे मद्यपान करतात अशांना तोडांचा, घशाचा तसेच स्वरनलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याचेही या संशोधनात म्हणण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला मद्यपानाची सवय नसेल तर ती चुकूनही लावून घेऊ नका आणि जर तुम्हाला सवय असेलच तर ती हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा असे संशोधनात सांगितले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये तरुण, प्रौढ, महिला अशा सर्वच स्तरात मद्यपानाचे प्रमाण जास्त असल्याने तेथील मद्यपींमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जात आहे.

यादृष्टीने पाश्चिमात्य देशांबरोबरच इतर देशांतही जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. जगभरात मद्यपानामुळे ५.८ टक्के लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी याची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

Story img Loader