Breast Milk Donate : कोणत्याही नवजात बाळासाठी आईचं दूध अमृतापेक्षा कमी नसते. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचे आहे. बाळाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासह विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आईचं दूध खूप गरजेचं असतं. कोणत्याही बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी किमान सहान महिने स्तनपान करणे आवश्यक असते, असं आरोग्य तज्ज्ञांच मत आहे. मात्र अनेकदा काही माता स्तनपान करु शकत नाहीत किंवा एखाद्या बाळाच्या जन्मानंतर त्याचा आईचा मृत्यू होतो अशा बाळासांसाठी ब्रेस्ट मिल्क बँकेतून दूध उपलब्ध होत आहे. अशा अनेक माता आहेत ज्या आपल्या बाळाच्या दूधाची गरज पूर्ण झाल्यानंतर ज्या नवजात बाळांना आई नाही त्यांच्या दूधाची गरज पूर्ण करतात. मात्र तुमच्यापैकीही कोणती माता ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा विचार करत असेल ही माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. बेस्ट मिल्क नेमकी कोणती माता दान करु शकते आणि त्यासाठी परवानगी कशी मिळते जाणून घेऊ यासंदर्भातील ए टू झेड प्रश्नांची उत्तर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निओलॅक्टा लाइफसायन्सेसच्या प्रादेशिक वैद्यकीय सल्लागार डॉ. व्हेनेसा मॅस्कारेन्हास, फार्म डी. यांनी द हेल्थसाईट.कॉमला दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या स्तनदा मातेने स्ततपान न केल्यास तिला मास्टिटिस आणि अगदी स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळ ज्या मातांना आपल्या बाळाची दूधाची गरज पूर्ण केल्यानंतर उर्वरित दूध दान करायचे असल्यास त्यांनी याची योग्य पद्धत कोणती याबाबत स्तनपान सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

सावध व्हा, रोजच्या खाण्यातील ‘हे’ सामान्य पदार्थ तुमचं आरोग्य आणू शकतात धोक्यात

मातांनी ब्रेस्ट मिल्क कुठे आणि कसे करावे?

दूध दान करणाऱ्या मातांसाठी ब्रेस्ट मिल्क बँकेत दूध दान करण्यासाठी काही थोड्या वेळल्या प्रक्रिया असतील. पण सर्वसाधारणपणे अशा माता मान्यताप्राप्त बँकांनी या प्रक्रियेचे पालन करण्याची अपेक्षा करू शकतात.

१) प्री- स्क्रीनिंगसाठी सर्वप्रथम दूध बँकेशी संपर्क साधावा. यावेळी संबंधीत मातेला तिच्या बाळाबद्दल आणि दोघांच्या सामान्य आरोग्यसंबंधीत तसेच त्या किती दूध दान करु शकतात याबद्दल थोडे माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रश्नांची सूची विचारली जाईल.

दूध दान करण्यासाठी आता एक फॉर्म भरावा लागेल. यात संबंधीत मातेला पात्रता निश्चित करण्यासाठी आरोग्याबाबतचा इतिहात आणि वर्तमान, जीवनशैली आणि औषधोपचार याविषयीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.

रक्त तपासणी करावी. एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी, एचटीएलव्ही आणि सिफिलीससाठी संभाव्य दात्यांची तपासणी केली जाते. मिल्क बँक तुम्हाला तुमचे रक्त घेण्यासाठी सूचना देईल आणि चाचणीचा खर्च भरेल.

तुमच्या फॉर्मचे आणि रक्तासंदर्भात पुनरावलोकन केल्यानंतर संबंधित माता दूध दान करण्यास पात्र आहे की नाही हे सूचित केले जाईल.

स्वच्छ, सुरक्षित दूध संकलनासाठी बँकेकडून तुम्हाला सूचना दिल्या जातील जसे की तुमचे हात धुणे, पंप आणि पंपाचे भाग व्यवस्थित स्वच्छ करणे, गोळा केलेले दूध कुठे आणि कसे साठवायचे इत्यादीची माहिती दिली जाते.

संबंधित मातेला दूध सुरक्षितपणे साठवण्‍यासाठी मिल्क बँक आवश्‍यक बाटल्‍या देतील.

संबंधीत मातेला दूध देण्यासाठी ब्रेस्ट मिल्क बँकेला भेट देण्याची गरज नाही. काही मिल्क बँका मोफत पिकअपची व्यवस्था करतात, यामुळे संबंधीत मातेला आरामात ब्रेस्ट मिल्क डोनेट करता येईल.

ब्रेस्ट मिल्क दान करण्यास कोणत्या माता पात्र असतात?

ज्या माता नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आहेत, ज्या मातांच्या बाळांचे निधन झाले आहे परंतु त्या दूध दान करण्यास इच्छुक आहेत अशा माता, रुग्णालयातील स्तनपान करवणारे कर्मचारी आणि समाजातील प्रेरित माता या ब्रेस्ट मिल्क डोनेट करू शकता. परंतु हे ब्रेस्ट मिल्क डोनेशन पूर्णपणे परोपकारी कारणांसाठी असते, त्यामुळे संबंधीत मातेला त्यासाठी कोणतेही पैसे दिले जात नाहीत.

यासाठी कोणत्या माता पात्र नाहीत?

एचआयव्ही, हिपॅटायटीस बी किंवा सी, किंवा सिफिलीसने ग्रस्त असलेल्या माता ब्रेस्ट मिल्क डोनेट करून शकत नाही, कारण यामुळे नवजात बालकांना या आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. याव्यतिरिक्त, ज्या स्त्रिया स्तनदा माता बेकायदेशीर औषधे घेत असतील किंवा मद्यपान धूम्रपान करत असतील तर त्या देखील यासाठी पात्र नाहीत.

ब्रेस्ट मिल्क बँका भारतातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहेत; यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी, संस्थांशी संपर्क साधू शकता. याबाबत अनेक बँका घरोघरी सेवा देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is eligible to donate breast milk all your questions about breast milk donation answered know here full process in marathi breast feeding sjr