एखादा व्यक्ती पोर्नोग्राफी पाहतो म्हटले की आपल्याकडे अजूनही भुवया उंचावल्या जातात. हा विषय काहीसा निषिद्ध मानला जात असल्याने मग अशा साईटसवर बंदी आणणे, किंवा त्या ठराविक काळासाठीच दाखवणे असे नियमही केले जातात. मात्र ही गोष्ट वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जे लोक आठवड्यातून एकहून जास्तवेळा पॉर्न पाहतात त्यांचा अध्यात्माकडे जास्त कल असतो असे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅम्युएल पेरी या अमेरिकन अभ्यासकाने ६ वर्षे १३०० जणांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष निघाल्याचे ‘इंडिपेंडंट’ वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पॉर्न पाहिल्यामुळे आपण काहीतरी गुन्हा केला आहे अशी अपराधीपणाची भावना मनात आल्याने पॉर्न पाहणारे आंबटशौकीन कालांतराने प्रार्थनेकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात असे पेरी यांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. यामध्ये आठवड्यातून एकदा किंवा त्याहून जास्त वेळा अशाप्रकारचे व्हिडिओ पाहणारे लोक श्रद्धाळू असतात आणि त्यांचे प्रार्थना करण्याचे प्रमाणही जास्त असते असे पेरी यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारचे चित्रपट पाहताना ज्यांना सर्वाधिक आनंद होतो ते जास्त धार्मिक असतात असेही पेरी यांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे, पेरी यांनी केलेला अभ्यास खोडून काढण्यात आला असून ‘जर्नल ऑफ सेक्स रिसर्च’मध्ये याच्या उलट नोंद करण्यात आली आहे. जे लोक कधीच पॉर्न पाहत नाहीत ते जास्त धार्मिक असतात आणि त्यांना आपल्या श्रद्धांबाबत फार कमी शंका उपस्थित होतात. मात्र मी पॉर्न पाहण्याचे समर्थन करत नाही पण जे जास्त पाहतात ते जास्त श्रद्धाळू असतात इतकेच मी मांडतो असे पेरी यांचे म्हणणे आहे.