Kesar Milk Health Benefits: केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच केशर दुधालाही खूप महत्त्व आहे. मात्र, हे केशर अत्यंत महाग असून त्याला प्रचंड मागणी आहे.केशरचे दूध फक्त मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही प्यावे. कारण ते त्यांच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. मुलांना रोज झोपण्यापूर्वी रात्री एक ग्लास गरम केशर दूध द्यावे. रात्रीची वेळ ही योग्य वेळ ठरते. चला जाणून घेऊया केशराचे दूध प्यायल्याने मुलांना कोणते फायदे होतात.

चांगली झोप येईल : केशर दूध प्यायल्याने मुलांना चांगली व गाढ झोप लागते. मूड आणि झोप नियंत्रित करण्याचे काम करते.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
Benefits of Eating Papaya in Winter
Papaya Health Benefits : पपई गरम असते की थंड? हिवाळ्यात खाल्ल्याने ‘या’ तीन समस्यांवर ठरू शकतो रामबाण उपाय
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
Pradhan Mantri Poshanshakti Nirman Yojana ,
केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?
Incentive Allowance anganwadi sevika
‘लाडक्या बहिणी’ जमविणाऱ्या ‘ताई’च उपेक्षित!

हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे : हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी केशराचे दूध मुलांना द्यावे. दुधात भरपूर कॅल्शियम असते. केशरमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि मॅंगनीज मोठ्या प्रमाणात आढळतात. केशर आणि दूध एकत्र मिसळले की ते हाडांसाठी फायदेशीर ठरते.

पचनक्रिया सुधारेल : मुलांमध्ये पचनाशी संबंधित समस्या खूप सामान्य आहे. ही समस्या दूर करण्यासाठी केशर दूध खूप मदत करू शकते. केशर दुधामध्ये पाचक गुणधर्म आढळतात, जे पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीही काही लोक केशर वापरतात. जर तुमच्या मुलाला पचनाशी संबंधित समस्या वारंवार जाणवत असतील तर त्याला दररोज रात्री एक ग्लास कोमट केशर दूध द्या. यामुळे त्याला बराच आराम मिळेल.

लहान मुलांचे सर्दी पडसे : १ चमचाभर दूधात केशराच्या २ काड्या खलून ते दूध पाजावे व थोड्या दुधाचा छातीवर व कपाळावर हात चोळावा.

जंत : समभाग केशर व कापूर घेऊन १ चमचा मधात घालून चाटण करावे.

हेही वाचा – सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर चावून खा, ‘या’ गंभीर आजारांपासून नेहमी सुरक्षित राहाल

मुलांची पोटफुगी, पोटदुखी, जुलाब : गरम दुधांत केशराच्या २ काड्या खलून दूध पिण्यास द्यावे व त्याच दुधाचा हात पोटावर फिरवावा.

Story img Loader