मुली फारच लाजाळू असतात. आपल्या मनातील भावना त्या सहजासहजी व्यक्त करत नाहीत. मुलं देखील मुलींच्या मनातील गोष्टी लगेचच ओळखू शकत नाहीत. मुलींसोबत चांगली मैत्री करायची असेल तर त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊन त्यानुसार वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मुलींच्या मनातील गोष्टी जाणून घेणे इतके सोपे नसते. कारण बहुतेक वेळा त्या आपल्या मनातील गोष्टी नीट व्यक्त करू शकत नाहीत. मुलींच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी, मुलींना नेमकी कशी मुले आवडतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
आजच्या काळामध्ये मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. मात्र काही गोष्टींमध्ये मुली स्वतःला मुलांच्या मागे राहण्यातच समाधानी असतात. उदाहरणार्थ – पहिल्यांदा प्रेम कोणी व्यक्त करायचे हा मुद्दा यावेळी समोर येतो. सध्याच्या काळामध्ये एखादी मुलगी मुलाला प्रपोज करत आहे ही संधी क्वचितच काही मुलांना मिळते. मात्र या गोष्टीमध्ये मुलींना पूर्णपणे दोष देता येणार नाही. आता हळूहळू मुलींनीही आपल्या आवडीच्या मुलाला प्रपोज करायला सुरुवात केली असली तरी अशी काही कारणं आहेत जी त्यांना असं करण्यापूर्वी हजार वेळा विचार करायला भाग पाडतात. येथे आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत, ज्यामुळे मुली मुलांना आधी प्रपोज करत नाहीत. याबाबतचे वृत्त navbharattimes ने दिले आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना डेट साठी विचारले जाणे जास्त आवडते असे अनेक अहवालांमधेय समोर आले आहे. हाच तर्क प्रपोज करण्यामध्ये देखील लागू होतो. या गोष्टीमुळे मुलींना असे वाटते की त्यांचे बरेच चाहते आहेत जे त्यांची वाट पाहत असतात. प्रत्येकाला असे वाटणे स्वाभाविक आहे. बर्याच मुली याकडे कुठेतरी प्राधान्य म्हणून पाहतात, त्यामुळे त्या मुलांना कधीच पहिल्यांदा प्रपोज करत नाहीत.
तसेच दुसरे कारण म्हणेज मुलाने प्रपोज केल्यामुळे आपल्याला नकार मिळेल याची भीती मुलींना नसते. मुलींना या स्थितीमधून जाण्यास अजिबात आवडत नाही. प्रेमात मिळणार नकार त्यांच्यासाठी एक प्रकारचा धक्का असतो. ज्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. यासह त्यांना त्यांची स्वतःची किंमत कमी झाल्यासारखे वाटू शकते.
मुली पहिल्यांदा मुलांना प्रपोज करणे टाळतात त्याचे तिसरे कारण म्हणजे त्यांना असे वाटते की आपण प्रपोज केले तर समोरचा मुलगा त्यांचा आदर करणार नाही. तसेच प्रत्येक गोष्टीत सोडून जाण्याची धमकी देत राहतील. कित्येकदा तूच मला प्रपोज केले होतेस मी तुझ्याकडे आलो नव्हतो असे मुलींना ऐकावे लागते. यामुळे मुली मुलांना पहिल्यांदा प्रपोज करत नाहीत. एकदा प्रेमात पडल्यास त्यांच्या नात्यात आपल्याला कायम झुकावे लागेल असेल त्यांना वाटते.
ज्या मुली आपल्या आवडीच्या मुलाला प्रपोज करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. लोकं त्यांना बोल्ड आणि सहज कोणाच्याही प्रेमात पडणारी मुलगी म्हणून त्यांच्याकडे पाहतात . साहजिकच असे कोणी तिला विचारल्यास मुलगी हे विचार सहन करणार नाही. यामुळे मुली केवळ इशाऱ्यातूनच प्रेम व्यक्त करणे योग्य समजतात .
शतकानुशतके फक्त मुलेच मुलींना प्रपोज करत आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलाने आपल्या आवडत्या मुलीसाठी वेड्यासारखा प्रयत्न केला तर त्याला रोमँटिक म्हणतात. पण जर मुलींनी असं काही केलं तर त्यांना हतबल म्हटलं जातं. इतकेच नाही तर त्या मुलींना कॅरेक्टरलेस अशा काही शब्दांचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला आवडत असलेल्या मुलाला स्वतःहून प्रपोज करण्याचा धोका पत्करत नाहीत.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)